‘स्त्री २’चा आलेख चढताच, ३०० कोटींचा टप्पा केला पार

    21-Aug-2024
Total Views | 34
 
stree 2
 
 
 
मुंबई : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या स्त्री २ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाचे बजेट वसूल केलं आहे. विकेंड लक्षात घेता स्त्री २ चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भूरळ पाडली आहे.
 
१४ ऑगस्टच्या मध्यरात्री ८.५ कोटी, पहिल्या दिवशी ५१.८ कोटी, दुसऱ्या दिवशी ३१.४ कोटी, तिसऱ्या दिवशी ४३.८५ कोटी, चौथ्या दिवशी ५५.९ कोटी, पाचव्या दिवशी ३८.१ कोटी, सहाव्या दिवशी २३.८ कोटी कमवत आत्तापर्यंत एकूण २५५.३५ कोटींची कमाई केली आहे. तर, देशात एकूण ग्रॉस कलेक्शन ३०६.१५ कोटी इतके झाले आहे.
 
 
 
‘स्त्री २’ने ‘कल्की 2898 एडी’ (हिंदी- २४ कोटी) आणि ‘फायटर’ला (२२ कोटी) मागे टाकलं असून हा चित्रपट २०२४ मध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. दरम्यान, २०२३ मधील शाहरुख खानच्या ‘जवान’ (६५.५ कोटी) आणि ‘पठाण’ (५५ कोटी) नंतर ‘स्त्री २’ हा आतापर्यंतचा पहिल्या दिवशी उत्तम ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121