नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवार, दि. २३ जुलै २०२४ सकाळी ११ वाजता मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सरकारने ४८.२१ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून चालू आर्थिक वर्षातील तूट जीडीपीच्या ४.९ टक्के असल्याचा अंदाज आहे.
यावेळी केंद्राने अर्थसंकल्पात विकसित भारतासाठी नऊ प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत. कृषी, आरोग्य, संरक्षण, रेल्वे, पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांसाठी सरकारने या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात विविध मंत्रालयांना वाटप झालेल्या निधीची माहिती घेऊ...
मंत्रालय/विभागाला वाटप केलेली रक्कम (कोटींमध्ये)
गृह मंत्रालय २१९६४३.३१
संरक्षण मंत्रालय ६२१९४०.८५
परराष्ट्र मंत्रालय २२१५४.६७
वित्त मंत्रालय १८५८१५८.५२
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय २७८०००.००
रेल्वे मंत्रालय २५५३९३.००
ग्रामीण विकास मंत्रालय १८०२३३.४३
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय १३२४६९.८६
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय ७१३७.६८
शिक्षण मंत्रालय १२०६२७.८७
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय २२३३२३.३६
रसायने आणि खते मंत्रालय १६८४९९.८७
दळणवळण मंत्रालय १३७२९३.९०
जलशक्ती मंत्रालय ९८७१३.७८
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ९०९५८.६३
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय ८२५७६.५७
महिला आणि बाल विकास मंत्रालय २६०९२.१९
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण १४२२५.४७
आदिवासी कार्य मंत्रालय १३०००.००
ऊर्जा मंत्रालय २०५०२.००
अणुऊर्जा विभाग २४९६८.९८
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय १९१००.००
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय १५९३०.२६
श्रम आणि रोजगार मंत्रालय २२५३१.४७
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय २२१३७.९५
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय २१९३६.९०
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय १६६२८.१२
अंतराळ विभाग १३०४२.७५
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय ११४६९.१४
अवजड उद्योग मंत्रालय ७२४२.००
कायदा आणि न्याय मंत्रालय ६७८८.३३
पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय ५९००.००
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय ५४५३.८३
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय ४५२०.००
वस्त्र मंत्रालय ४४१७.०३
माहिती आणि प्रसारण मंत्रालय ४३४२.५५
आयुष मंत्रालय ३७१२.४९
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय ३४४२.३२
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय ३३३०.३७
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय ३२९०.००
सांस्कृतिक मंत्रालय ३२६०.९३
अल्पसंख्याक कार्य मंत्रालय ३१८३.२४
पृथ्वी विज्ञान मंत्रालय ३०६४.८०
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय २६६७.०६
कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालय २३७९.८७
बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय २३७७.४९
नागरी विमान वाहतूक मंत्रालय २३५७.१४
पंचायती राज मंत्रालय ११८३.६४
पोलाद मंत्रालय ३२५.६६
खाण मंत्रालय १९४१.०६
राष्ट्रपती, संसद, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि उपाध्यक्ष यांचे सचिवालय १८८४.९२
सहकार मंत्रालय ११८३.३९
नियोजन मंत्रालय ८३७.२६
कोळसा मंत्रालय १९२.५५
संसदीय कामकाज मंत्रालय ६४.००
पर्यटन मंत्रालय २४७९.६२
एकूण ४८२०५१२.०८