पूजा खेडकर प्रकरण! पोलिसांकडून मनोरमा खेडकरांची कार आणि पिस्तूल जप्त

    20-Jul-2024
Total Views |
 
Manorama Khedkar
 
पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविषयी एक महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्याकडील पिस्तूल आणि गाडी जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी या पिस्तुलाने शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
 
मनोरमा आणि त्यांचे पती दिलीप खेडकर यांचा जमिनीवरून शेतकऱ्यांशी वाद झाला. त्यानंतर मनोरमा खेडकर यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत त्या शेतकऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्या घरातून पिस्तूल आणि तीन गोळ्या जप्त केल्या आहेत.
 
हे वाचलंत का? - ब्रेकिंग! ग्रँट रोड परिसरातील इमारतीची बालकनी कोसळली, एकाचा मृत्यू  
 
पूजा खेडकर प्रकरण पुढे आल्यापासूनच मनोरमा खेडकर फरार होत्या. त्यानंतर गुरुवारी पुणे ग्रामीण पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथून त्यांना अटक केली. वैद्यकीय तपासणी करून मनोरमा खेडकरला न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121