मुंबई : अनंत अंबानी व राधिका मर्चंट अखेर १२ जुलै रोजी विवाहबंधनात अडकले. लाखोंच्या संख्येने पाहूण्यांनी देश-विदेशातून हजेरी लावत या नव्या दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, गेले अनेक महिने दोघांच्याही लग्नांचे विविध विधी सुरु होते. अशात, नीता अंबानी यांचा लग्न झाल्यानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे. “या लग्नाच्या गडबडीत जर काही चुकलं असेल तर माफ करा”, असा नीता अंबानी यांचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
नीता अंबानी यांनी अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यात माध्यमांसमोर येऊन सर्वांचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, “नमस्कार…तुम्ही सगळे एवढ्या दिवसांपासून माझ्या अनंत आणि राधिकाच्या लग्नाला उपस्थित आहात. तुमचे मनापासून आभार… हे लग्नघर आहे आणि तुम्ही आमच्या आनंदात सहभागी झालात ही मोठी गोष्ट आहे. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर हे लग्नघर आहे असं समजून माफ करा”
दरम्यान, १२ ते १४ जुलै दरम्यान अनंत-राधिकाचा लग्नसोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला. यानंतर १५ जुलै रोजी ( सोमवार ) या सोहळ्याला हातभार लावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अंबानी कुटुंबीयांकडून खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.