मुंबई: झोमॅटो कंपनीने लिहिलेल्या एका पोस्टरवर संमिश्र प्रतिसाद उमटत आहेत. काही कंपनीच्या पोस्टरवर टीका करत आहेत तर काही जण पाठिंबा! झाले असे की कंपनीने नुकतीच रणरणत्या उन्हात गरज नसल्यास अथवा आवश्यकता नसल्यास ऑर्डर करू नये असे लिहिले होते. एक्सवर लिहिलेल्या पोस्टरवर विविध प्रतिकिया नेटकरी उमटवत आहेत.
काही नेटिझन्सनी कंपनीला पोस्ट लिहिण्यापेक्षा उपाययोजना करण्यास सांगितले आहे. तर काहींनी ग्राहकांना सल्ले देण्यापेक्षा फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी उपाययोजना करण्यास सांगितली तर काहींनी या पोस्टला लाईक करून पाठिंबाही दिला आहे. एकाने १२ ते ४ पर्यंत सेवा बंद केल्यास काही हरकत नाही. नफ्यापेक्षा कधी कधी माणूस बनणे चांगले असते' अशी प्रतिक्रिया एका युजरने नोंदवली आहे.
दुसऱ्याने प्रत्येक ऑर्डरसाठी अनिवार्य "उष्णतेशी संबंधित टीप" किंवा "हार्डशिप चार्ज" ची कल्पना प्रस्तावित केली, ज्याचे पैसे संपूर्णपणे डिलिव्हरी रायडर्सना कठोर कामकाजाच्या परिस्थितीची भरपाई करण्यासाठी दिले जातात. काहींनी हा मार्केटिंग स्टंटबाजी म्हणून झोमॅटो कंपनीवर ताशेरे ओढले आहेत.