मुंबई: एचडीएफसी असेट मॅनेजमेंटकडून एचडीएफसी लो व्होलेटिलीटी फंड (HDFC Nifty 100 Low Volatility 30 Index Fund) ची घोषणा करण्यात आली आहे. जून २१ पासून हा फंड खुला झाला असून ५ जुलैपर्यंत यांची नोंदणी सुरू राहणार आहे. ज्यांना मोठ्या कालावधीसाठी लार्जकॅप फंडातून ३० किमान अस्थिरता (Volatility) असलेल्या ३० समभागात गुंतवणूकीची संधी हवी असल्यास त्यांच्यासाठी हा फंड अनुरूप ठरू शकतो.
याबद्दल बोलताना एचडीएफसीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ' ही योजना लार्ज-कॅप पॅरेंट इंडेक्स, म्हणजेच NIFTY 100 मधील ३० सर्वात कमी अस्थिर स्टॉक्सच्या प्रदर्शनासह दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य असू शकते.
तसेच याविषयी बोलताना एचडीएफसी असेट व्यवस्थापन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक नवनीत मुनोत म्हणाले की, 'एचडीएफसी म्युच्युअल फंडात, प्रत्येक भारतीयासाठी संपत्ती निर्माण करण्याचे आमचे ध्येय गुंतवणुकदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला गुंतवणुकीच्या विस्तृत समाधानांची ऑफर देण्यास प्रवृत्त करत आहे. आम्ही आमच्या २० वर्षांचा अनुभवाचा फायदा घेऊन, इंडेक्स सोल्यूशन्समध्ये उत्कृष्टता सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. या क्षेत्रातील कौशल्याने आम्ही HDFC NIFTY100 लो व्होलॅटिलिटी ३० इंडेक्स फंड सादर करण्यास उत्सुक आहोत, जो गुंतवणूकदारांना बाजारातील अस्थिरतेला सामोरे जाण्याचा एक सोपा मार्ग प्रदान करतो,'असे म्हटले आहे.
निफ्टी १०० लो व्होलेटिलीटी फंडांमध्ये गेल्या वर्षभरातील कमी अस्थिरता असलेले ३० समभाग (Stocks) निवडले जातात त्यातून कमीतकमी अस्थिरतेचा फटका बसत परतावा अधिक मिळण्याची तरतूद करण्याचा प्रयत्न केला जातो. एनएसई (NSE)सांख्यि कीनुसार,निफ्टी १०० निर्देशांक रोलिंग बाबतीत १,३,५,१० वर्षाच्या कालावधीसाठी असतो.