जीएसटी काऊन्सिलची नवी बैठक २२ जूनला ' या' वर चर्चा होणार

    13-Jun-2024
Total Views | 23

Nirmala Sitharaman
 
 
मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी काऊन्सिल (GST Council) ची बैठक २२ जूनला बोलावली आहे. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या असताना आगामी काळात सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. याच पार्श्वभूमी वर निर्मला सीतारामन यांनी ५३ वी जीएसटी काऊन्सिल बैठक बोलावली आहे. आगामी काळातील जीएसटीची दिशा कशी असेल यावर या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे.
 
जून २२, २०२४ ला जीएसटी काऊन्सिलची ५३ वी बैठक होणार आहे असे एक्सवर जीएसटी काऊन्सिलचा सोशल मीडियावर म्हटले गेले आहे. साधारणतः ही बैठक जीएसटीतील फेर आढावा घेण्यासाठी दर तीन महिन्यांनी होत असते‌. यापूर्वी अपेक्षित वेळेला निवडणूक व इतर कार्यक्रमांमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती.
 
या काऊन्सिल बैठकीत अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. जीएसटीची मर्यादा व इतर मुद्यावर चर्चा होणार आहे. मुख्यतः सध्या गाजत असलेल्या गेमिंग कंपन्यांवर २८ टक्के कर सरकारने कायम ठेवल्याने गेमिंग कंपन्यामध्ये नाराजी होती. तसेच कॅसिनोवर देखील २८ टक्के जीएसटी ठेवण्यात आला आहे. गेमिंग कंपन्यांनी १८ टक्क्यांपर्यंत जीएसटीची मर्यादा असावी असे आवाहन सरकारला केले होते. त्यामुळे या बैठकीत ऑनलाईन गेमिंग, रेसिंग, कॅसिनो यावर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीवर फेरविचार होतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
याशिवाय टेक्साटईल, रासायनिक खते या क्षेत्रातील इन्व्हर्टटेड ड्युटी स्ट्रक्चर (Inverted Duty Structure) हा मुद्दा देखील ऐरणीवर आला असल्याने यावर जीएसटी काऊन्सिल फेरविचार करेल का याकडे तज्ञांचे लक्ष लागले आहे.किंबहुना, वस्त्रोद्योग क्षेत्राची सुधारणा मोठ्या राजकीय विरोधानंतर स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, खते कंपन्यांना काही अंशी दिलासा मिळाला होता कारण जीएसटी परिषद उलट शुल्क संरचना आणि सबसिडीमुळे परतावा जारी करण्यासाठी परिपत्रक जारी करण्याची शिफारस करण्याची शक्यता आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121