शेअर बाजार अपडेट: महागाई आकडेवारी आल्यानंतर बाजारात उसळी ! सेन्सेक्स १५२.१४ अंशाने उसळला

मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ कायम, बँक, एफएमसीजी, मिडिया समभागात घसरण

    13-Jun-2024
Total Views | 26

Stock Market
 
 
मुंबई:आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. विशेषतः भारतातील महागाई आकडेवारी जाहीर झाल्यानंत र बाजार उसळला आहे.सकाळी सेन्सेक्स निर्देशांक १५२.१४ अंशाने वाढत ७६७५८.७१ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक ३९.५० अंशाने वाढत २३३६२.४५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात आज अनुक्रमे ०.२० व ०. १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
सेन्सेक्स बँक निर्देशांक ५८.३६ अंशाने वाढत ५६८६६.४६ पातळीवर वाढ झाली आहे तर निफ्टी बँक निर्देशांक वाढत ४३.४० अंशाने वाढत २३३६२.४५ पातळीवर वाढला आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५० व ०.४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६७ व ०.३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. निफ्टी बँक (०.०४%), ऑटो (०.१४), एफएमसीजी (०.३७%, मिडिया (१.५०%), मेटल (०.३५%), प्रायव्हेट बँक (०.०९%) समभागात घसरण झाली आहे तर रिअल्टी (२.०७%), हेल्थकेअर (०.४४%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.५८%), कनज्यूमर ड्युरेबल्स (०.४७%) समभागात वाढ झाली आहे.
 
विशेषतः कालच युएस व भारताची महागाई आकडेवारी समोर आली आहे. युएस मधील महागाई दर अपेक्षेप्रमाणे ठरल्याने युएस बाजारात स्थैर्य आले होते. डाऊ जोन्स वगळता शेअर बाजारात तेजी आली होती. यावर्षी युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात चारवेळा करू शकते अशी शक्यता आहे दुसरीकडे भारतात सरकारी किरकोळ महागाई दर पुढे आले आहेत. १२ महि न्यातील किरकोळ महागाई दरात घट होत ४.७५ टक्क्यांवर पोहोचले आहे. आरबीआयच्या २ ते ६ टक्यांच्या महागाई मर्यादेत असल्याने भारतातही दर कपात संभव आहे. वर्ल्ड बँकेने भारतीय अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे म्हणते आपला सुधारित अर्थव्य वस्थतेतील दर ६.४ वरून वाढवत ६.६ टक्क्यांवर नेल्याने बाजारात सकारात्मकता कायम होती. परिणामी बाजारात वाढ झाली आहे.
 
बीएसईत लार्सन, टेक महिंद्रा, टीसीएस, टायटन कंपनी, नेस्ले, विप्रो, एम अँड एम, इन्फोसिस, एचडीएफसी बँक , बजाज फाय नान्स, एशियन पेंटस, बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा, रिलायन्स, एसबीआय, इंडसइंड बँक या समभागात वाढ झाली आहे तर एचयुएल, पॉवर ग्रीड, टाटा स्टील, एनटीपीसी, मारूती सुझुकी, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, सनफार्मा या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत सकाळच्या सत्रात एचडीएफसी लाईफ, डिवीज, श्रीराम फायनान्स, लार्सन, टेकमहिंद्रा, टायटन कंपनी, विप्रो, हिंदा ल्को, नेस्ले, बजाज फायनान्स, बीपीसीएल, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंटस, अपोलो हॉस्पिटल, कोटक महिंद्रा, एस बीआय, रिलायन्स,आयटीसी या समभागात वाढ झाली आहे तर आयशर मोटर्स, एचयुएल, पॉवर ग्रीड, ग्रासीम, कोल इंडिया, टा टा स्टील, एनटीपीसी, जेएसडब्लू स्टील, बजाज ऑटो, ओएनजीसी, हिरो मोटोकॉर्प, मारूती सुझुकी, भारती एअरटेल, टाटा मोट र्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, सनफार्मा, सिप्ला, एक्सिस बँक, अदानी एंटरप्राईज, अदानी पोर्टस, ब्रिटानिया,आयसीआयसीआ य बँक,अल्ट्राटेक सिमेंट या समभागात घसरण झाली आहे.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121