रोहिणी हट्टंगडी व अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार
मुंबई : प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. त्यावेळी रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो. ह्या वर्षी मा.श्री. अशोक सराफ आणि मा.श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार व इतर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सदर ‘पुरस्कार वितरण समारंभ’ शुक्रवार, दिनांक १४ जून २०२४ रोजी यशवंत नाटय मंदिर, मनमाला टँक रोड, माटुंगा येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण नाटय संकुलाच्या नूतनीकरणानंतर यशवंत नाट्य मंदिर रसिकार्पण सोहळा देखील संपन्न होणार आहे.
हा सोहळा अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार, यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नाटयसंमेलनाध्यक्ष मा.डॉ. जब्बार पटेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री तथा अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त उदय सामंत, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त शशी प्रभू, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, अशोक हांडे, यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
नाट्यपरिषद- मुंबई कार्यकर्ता पुरस्कारासाठी गणेश तळेकर, नाट्यपरिषद- शाखा कार्यकर्ता पुरस्कारासाठी प्रशांत जोशी, सर्वोत्कृष्ट एकपात्री पुरस्कारासाठी दिपाली घोंगे, सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्कारासाठी शशांक लिमये, गुणी रंगमंच कामगार विजय जगताप, नाट्यसमीक्षक पुरस्कारासाठी संजय देवधर (वृत्तपत्र- देवदूत), बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठी गोविंद गोडबोले, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था पुरस्कारासाठी अभिनय, कल्याण, सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक पुरस्कारासाठी प्रणित बोडके, रंगभूमी व्यतिरिक्त केलेल्या विधायक कार्यासाठी अशोक ढेरे, सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कारासाठी सुनील बेंडखळे, कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कारासाठी श्याम आस्करकर, तसेच नाट्य परिषदेच्या शाखेचे विनामूल्य काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी स्व.रितेश साळुंके यांची निवड करण्यात आली आहे.
व्यावसायिक नाट्य पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट लेखक संकर्षण कऱ्हाडे (नियम व अटी लागू), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी (नियम व अटी लागू), सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार संदेश बेंद्रे (२१७ पद्मिनी धाम), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार अमोघ फडके (जर तर ची गोष्ट), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार सौरभ भालेराव (आजीबाई जोरात), सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार उल्लेश खंदारे (कुर्र), सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक (नियम व अटी लागू), सर्वोत्कृष्ट अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (नियम व अटी लागू), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता मयुरेश पेम (ऑल द बेस्ट), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आशुतोष गोखले (जर तर ची गोष्ट), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री लीना भागवत (इवलेसे रोप), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री शलाका पवार (हीच तर फॅमिलीची गम्मत), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पर्ण पेठे (चार चौघी), सर्वोत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटक डबल लाईफ (रंगशारदा प्रतिष्ठान) यांना प्रदान करण्यात येणार आहे.