आता डीपफेक व्हिडिओ ओळखणे होणार सोप्पे! निवडणुकीच्या तोंडावर ओपन ए आय कंपनीची नवी योजना!

नवीन DALl E 3 या टूलची निर्मिती

    08-May-2024
Total Views | 43

Open AI
 
 
मुंबई: निवडणुकीच्या धामधुमीत खोटे व्हिडिओ खोटे फोटो वायरल होण्याची शक्यता असते. अशातच काही प्रकरणे यापूर्वीही अनेकदा समोर आल्याने ओपन ए आय (Open AI) कंपनीने युएस स्थित कंटेंट प्रोव्हिंस अँड ऑथेन्टिसिटी कमिटीशी हातमिळवणी केली आहे. आगामी काळातील 'डिपफेक' व्हिडिओ रोखण्यासाठी कंपनीने ही नवी खबरदारी घेण्याचे ठरवले आहे. ओपन ए आय ही चाट जीपीटी बनवणारी मातृसंस्था आहे. याशिवाय भारतातही मोठे पाऊल उचलत कंपनीने भारतीय निवडणूक आयोगाशी हातमिळवणी देखील केली आहे.
 
भारतातील आगामी काळातील सोशल मीडियावरील बनावट कंटेट ओळखण्यासाठी कंपनीची प्रणाली विशेष काम करणार आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना डीपफेक व्हिडिओ बाबत सावधानतेचा इशारा दिला होता. कुठल्याही राजकीय पक्षांकडून या बनावट कंटेंट अथवा डीपफेक व्हिडिओ येणार नाही याची काळजी घेण्यासाठी पक्षांना निवडणूक आयोगाने ताकीद दिली होती. भारतीय तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत ६६ सी, ६६ डी, कलम १२३ (४) व १७१ जी, ४६५,४६९,५०५ अंतर्गत डीपफेक व्हिडिओ तयार करण्यात येणारा व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात येऊ शकते.
 
जागतिक पातळीवरील डीपफेक व्हिडिओ ओळखण्यासाठी गेले काही दिवस अडचण येत होती तसेच या वाढलेल्या चिंतेने २० हून अधिक तंत्रज्ञान कंपन्यांनी एकत्र येत बनावट कंटेंट ओळखण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरवले आहे.
 
हीच गरज ओळखत ओपन ए आय कंपनीने DALl E 3 नावाचे टूल बनवले आहे ज्यामध्ये कंटेटची पडताळणी करणे शक्य होणार आहे. याशिवाय मायक्रोसॉफ्ट कंपनीची मदत घेत ओपन ए आय ' Societal Resilience ' निधी तयार करणार असुन एआय बद्दल जागरुकता करण्यासाठी याचा वापर केला जाईल. चाटजीपीटी निर्मात्याने डिजिटल सामग्री जसे की फोटो किंवा ऑडिओ अशा सिग्नलसह चिन्हांकित करण्यासाठी छेडछाड-प्रतिरोधक वॉटरमार्किंग जोडण्याची योजना आखली आहे जी काढणे कठीण होणार आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121