आता कॉल ड्रॉपमधून टेलिकॉम कंपन्यांना सुट्टी नाही! ट्रायचे ' हे ' नवे निर्बंध

आयटी सिस्टिममध्ये सुधारणा करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना मिळाला वाढीव वेळ

    07-May-2024
Total Views | 50

Call Drop
 
 
मुंबई: ट्रायने (Telecom Regulatory Authority of India) ने नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी अतिरिक्त वेळ टेलिकॉम कंपन्यांना दिल्याचे प्रसारमाध्यमांना सुत्रांनी सांगितले आहे. टेलिकॉम कंपन्यांना कॉल ड्रॉपमध्ये सुधारणा करण्यासाठी ट्रायने निर्देश दिले होते.वारंवार कॉल ड्रॉपमध्ये होणारी वाढ पाहता यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्यास वाढीव अवधी कंपन्यांना देण्यात आला आहे.
 
'अंमलबजावणी करण्यास वाढीव वेळ दिला असला तरी या नियमात कुठलीही सूट कंपन्याना मिळणार नसल्याचे' सूत्रांनी सांगितले आहे. ट्रायकडे वेळोवेळी कॉल ड्रॉपमधील वारंवार तक्रारी येत होत्या त्यांची दखल घेत संस्थेने कंपन्यांना त्यांच्या आयटी सुविधेत बदल करण्याचे निर्देश दिले होते.
 
एप्रिल २६ ला ट्रायने ग्रॅनयूलर माहितीसह बेस स्टेशनची माहिती देण्यास बंधनकारक केले आहे. याशिवाय साईटचे स्थळ, फ्रीकवेन्सी, तंत्रज्ञान (२ जी, ३ जी, ४ जी, ५ जी) यात सुधारणा करण्यास सांगितले होते. याविषयीची इत्यंभूत माहिती कंपन्यांना ट्रायला देणे बंधनकारक केले होते. म्हणून ट्रायने क्वालिटी ऑफ सर्विसेस (QoS) सुधारणेसाठी व सिस्टीममध्ये बदल करण्यासाठी हा वाढीव वेळ दिला आहे.
 
टेलिकॉमने बेस स्टेशन, टॉवरची माहिती ट्रायला देण्यास अनिवार्य असणार आहे यामुळे त्याच्यात नक्की बिघाड काय याची शहानिशा करणे ट्रायला सोपे होऊ शकते असे ट्राय अधिकारी यांचे म्हणणे आहे. नवीन नियमानुसार, टॉवरची माहिती, ठिकाण, जिल्हा, शहर या सगळ्याची प्राथमिक माहिती रेग्युलेटरला देणे टेलिकॉम कंपन्यांना बंधनकारक असणार आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121