पेटीएमने टीममध्ये पुनर्रचना केली ! राकेश सिंह यांची पेटीएम पेमेंट बँकेच्या सीईओपदी नेमणूक

भावेश गुप्ता यांचा राजीनामा, वरूण श्रीधर हे पेटीएम सर्विसेसचे सीईओ होणार

    06-May-2024
Total Views | 35

Paytm
 
 
मुंबई: पेटीएम म्हणजेच One97 Communications कंपनीच्या नेतृत्वात नवीन बदल होणार आहे.आरबीआयच्या पेटीएम पेमेंट बँकेवरील आरबीआयच्या कारवाईनंतर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष विजय शर्मा यांच्या पेटीएम पेमेंट बँकेच्या सीईओ पदावरुन राजीनामा दिल्यानंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या संचालक मंडळात मोठे फेरबदल झाले होते.आता पेटीएम मनीमध्ये फेरबदल झाले आहेत. पेटीएम मनीचे माजी मुख्य अधिकारी वरूण श्रीधर यांनी पदाचा राजीनामा देत पेटीएम सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडवर निवड झाली आहे. पेटीएम पेमेंट बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर राकेश सिंह यांची निवड झाली आहे.
 
कंपनीने माहिती दिल्याप्रमाणे,अध्यक्ष व मुख्य सीओओ भावेश गुप्ता हे पदाचा राजीनामा देणार असून 'वैयक्तिक' कारणांसाठी हा राजीनामा ते देणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.मार्च ३१ हा गुप्ता यांच्यासाठी शेवटचा दिवस असणार आहे.पेटीएमसाठी त्यांनी चार वर्ष काम केले असताना मागील वर्षी त्यांची सीओओ पदी बढती झाली होती. कर्ज पुरवठा, विमा,ऑनलाईन व ऑफलाईन पेमेंट, तसेच ग्राहक पेमेंट, रिस्क, कंपलायंस या जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्या.
 
आता ते कंपनीच्या अँडव्हायजरी (मार्गदर्शक) सल्लागार पदी असणार आहेत. यापदी आता वरूण श्रीधर यांची नेमणूक झाली आहे. याशिवाय श्रीधर यांच्यावर म्युचल फंड व वेल्थ मॅनेजमेंट या विभागाची जबाबदारी असणार आहे.
 
आपल्या नेमणूकीवर नवनियुक्त सीईओ राकेश शर्मा म्हणाले,'आम्ही भारतातील शीर्ष ब्रोकर्समध्ये स्वत:चे स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवल्याने आमचे लक्ष कमी किमतीत पारदर्शक किमतीत स्थिर, नाविन्यपूर्ण उत्पादने वितरीत करण्यावर असेल. सेबी नियमांचे पूर्ण पालन करून आधीच फायदेशीर ऑपरेशन वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असेल.'
 
पेटीएमने या नव्या नियुक्तीविषयी बोलताना, आगामी काळात कंपनी आर्थिक उत्पादने दुप्पट करण्यावर भर देणार आहे. याशिवाय नेतृत्व करणारी टीम ही थेट पेटीएम सीईओ व ज्येष्ठ व्यवस्थापनाबरोबर काम करणार आहे. कंपनीची पुनर्रचना होत असताना आगामी काळातही कंपनी यशस्वीपणे कामकाज करून सर्व नियमांचे पालन करत व्यवसाय वृद्धिंगत करणार आहे ' असे कंपनीने म्हटले आहे.
 
कंपनीने नुकतेच थर्ड पार्टी पेमेंट प्रणाली म्हणून 'Third Party Application Provider (TPAP) म्हणून कामास सुरुवात केली आहे. युपीआय पेमेंट याकरिता कंपनीने येस बँक, एक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँकेशी हातमिळवणी केली होती. याशिवाय कर्ज वाटप करण्यासाठी कंपनीने विना बँकिग वित्तीय संस्था (NBFC) शी हातमिळवणी केली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
शनीदेवांच्या दरबारात भ्रष्टाचारी मोकाट ; शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्तांकडून बनावट अॅपद्वारे भाविकांची फसवणूक

शनीदेवांच्या दरबारात भ्रष्टाचारी मोकाट ; शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्तांकडून बनावट अॅपद्वारे भाविकांची फसवणूक

अन्याय करणाऱ्याला शनिदेव शिक्षा करतात अशी श्रध्दा आहे. शनी शिंगणापूरात कधी चोरी होत नाही म्हणून तेथील घरांना दरवाजे नाहीत. पण शनी शिंगणापूर देवस्थानातील विश्वस्तच देवाची फसवणूक करून उजळ माथ्याने मिरवत आहेत. शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांनी देवस्थानात सुमारे अडीच हजार बोगस कर्मचारी दाखवून हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. पूजाविधीचे बोगस अॅप तयार करून त्या माध्यमातूनही भाविकांकडून कोट्यवधी रुपये उकळले जात असल्याची धक्कादायक माहिती शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी विधानसभेत देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121