मुंबई: आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सुरूवात सकारात्मक झाली आहे. आठवड्यातील सुरूवात चांगली झाल्याने अखेरच्या सत्रात काय हालचाली होतात ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे. सेन्सेक्स सकाळी ११ वाजेपर्यंत १८४.०८ अंशाने वाढत ७५५९३.१९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ४९.५ अंशाने वाढत २३००६.१५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३५१.५७ अंशाने वाढ होत ५६२७०.१७ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३४३.६५ अंशाने वाढत ४९३१५.३० पातळीवर पोहोचला आहे.
बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५४ व ०.१० टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६२ व ०.७० अंशाने वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात ( Sectoral Indices) मध्ये आयटी (०.६९%), फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.५८%), बँक (०.६७%), प्रायव्हेट बँक (०.६३%), फायनाशियल सर्विसेस (०.६६%) या समभागात वाढ झाली आहे. तर मिडिया (०.५६%), मेटल (०.०९%), तेल गॅस (०.५१%) समभागात घसरण झाली आहे.
जागतिक पातळीवरील संमिश्र वातावरण असताना निवडणूकीचे निकाल जवळ आल्याने व भारतीय अर्थव्यवस्थेतील स्थिरता व नुकत्याच आलेल्या पीएमआय निर्देशांक व इतर जीडीपीतील वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने भारताच्या अर्थ व्यवस्थेत स्थैर्य येत आहे. मात्र निकाल येईपर्यंत बाजारातील समभागात (Shares) मध्ये चढ उतार राहण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
आज सकाळच्या सत्रात बीएसईतील कुठल्या समभागात वाढ व घसरण ?
कुठले वधारले ? सोभा (४.६७%), गोदरेज प्रोपर्टी (४.२२%), परसिंसटंट सिस्टिम (३.९२%), आयोबी (३.०३%) सनटेक रियल्टी (१.४३%) फिनोलेक्स केबल (१०.०२%), एस्ट्रा मायक्रोव्हेव (१०.०२%), इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स (९.३६%) या समभागात सर्वाधिक वाढ झाली आहे.
कुठले घसरले ? टेक्नो इलेक्ट्रिक अँड इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड (८.५७%), बेस्ट एग्रोलाईफ लिमिटेड (७.५२%), ईआयएच लिमिटेड (५.०५%), शिंडलर (५.०%), सीआयई ऑटोमोटिव (२.८६%)
आज सकाळच्या सत्रात एनएसईतील कुठल्या समभागात वाढ व घसरण?
कुठले वधारले? डिवीज (४.२५%), ओएनजीसी अदानी पोर्टस (१.४४%), फिनोलेक्स केबल (८.१८%), जेबीएम ऑटो (७.३६%), आर आर केबल (६.७%), ग्लेनमार्क फार्मा (६.५४%)
कुठले घसरले ? अदानी एंटरप्राईज (२.२८%), ओएनजीसी (२.१२%), विप्रो (२.०४%), आयशर मोटर्स (१.९० %) ब्रिटानिया (१.८७%), शिंडलर (५.०%), इमामी (३.७९%), मनपूरम फायनान्स (३.३३%)