'कोटा फॅक्ट्री ३'ची रिलीज डेट जाहिर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार
25-May-2024
Total Views | 34
मुंबई : आयआयटी-जेईई आणि एनईईटी परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांची खरी कहाणी दाखवणारी कोटा फॅक्टरी ही वेब सीरीज आता तिसरा सीझन घेऊन येत आहे. नुकतीच त्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या सीरिजचा पहिला सीझन २०१९ मध्ये युट्यूबवर आला होता. त्यानंतर या सीरिजची लोकप्रियता लक्षात घेऊन नेटफ्लिक्सने या सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित केला होता. आणि आता या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.
कोटा फॅक्ट्रीचा सीझन ३ नेटफ्लिक्सवर ७ जून पासून प्रसारित होणार आहे. या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा राघव सुब्बूने सांभाळली असून अरुणाभ कुमार यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. या वेब सीरीजचे कथानक कोटा, राजस्थान येथील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) मध्ये स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थांवर आधारित ही सीरिज आहे.
'कोटा फॅक्ट्री' मध्ये जितेंद्र कुमार, अहसास चन्नासह आलन खान, मयूर मोरे, रंजन राज सारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच नव्या सीझनमध्ये तिलोत्मा शोमदेखील झळकणार असल्याचं समोर आलं आहे.