पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणकुीचे नवे वेळापत्रक जाहीर

    24-May-2024
Total Views | 32
 Graduates and Teachers Constituencies
 

मुंबई :     निवडणूक आयोगाकडून पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकांचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २६ जूनला मतदान होणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून परिपत्रक जारी करण्यात आले असून पुढील महिन्यात २६ तारखेला मतदान होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे नवे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.
 

दरम्यान, पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील एकूण ०४ सदस्यांचा कार्यकाळ ०७ जुलै २०२४ रोजी संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून सदर जागांकरिता दि. २६ जूनला मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच, या निवडणुकीकरिता नामांकन करण्याची मुदत दि. ३१ मे २०२४ असणार आहे. त्याचबरोबर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दि. ०१ जून २०२४ असेल, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील एकूण ०४ जागांकरिता दि. २६ जून २०२४ रोजी सकाळी ०८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे तर ०१ जुलै २०२४ रोजी मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, पदवीधर(०२) व शिक्षक मतदारसंघातून(०२) महाराष्ट्र विधानपरिषदेची द्विवार्षिक निवडणूक घेण्यात येणार आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121