वेदांत अग्रवालची बाल सुधारगृहात रवानगी! 'असा' असेल दिनक्रम
23-May-2024
Total Views | 73
पुणे : पुणे अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवाल याचा जामीन रद्द करुन १४ दिवसांसाठी त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर त्याचे वडील विशाल अग्रवाल यांनाही पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, बाल सुधारगृहात आरोपी वेदांतची दिनचर्या कशी असेल याबाबतची माहिती पुढे आली आहे.
बाल सुधारगृहात आरोपीला सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत नाष्ता दिला जातो. यात पोहे, दुध, उपीट, अंडी इत्यादी पदार्थ असतात. त्यानंतर ११ वाजता सर्वांची प्रार्थना होते. ११ ते १ वाजेपर्यंत इंग्रजीसह वेगवेगळ्या विषयांच्या शिकवण्या होतात. त्यानंतर दुपारी १ ते ४ वाजतापर्यंत डॉर्मेटरीमध्ये आरामाकरिता वेळ दिला जातो.
आराम झाल्यानंतर ४ वाजता पुन्हा नाष्ता मिळतो. त्यानंतर ५ वाजेपर्यंत टीव्ही पाहण्यासाठी वेळ देतात. सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत फुटबॉल, हॉलीबॉल खेळण्याची सुट्टी असते. सायंकाळी ७ नंतर जेवण देतात. त्यानंतर ८ वाजता झोपण्यासाठी डॉर्मेटरीमध्ये पाठवण्यात येते.
वेदांत अग्रवालला सज्ञान समजून वागणूक देण्यात यावी, असा अर्ज पोलिसांनी केला होता. परंतू, न्यायालयाने यावर कुठलाही निर्णय दिला नाही. आरोपी वेदांतला १४ दिवसांसाठी बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.