घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी SIT स्थापन! मृतांचा आकडा वाढला
22-May-2024
Total Views | 44
मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली असून याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढल्याचेही सांगण्यात येत आहे.
सोमवार ५ मे रोजी आलेल्या अवकाळी पावसामुळे घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून तो १७ वर गेला आहे. याशिवाय जखमी झालेल्या ७५ जणांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या एसआयटीमध्ये एकूण सहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दुर्घटनेतील आरोपी भावेश भिडेच्या घराची झडती घेतली असून काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.
भावेश भिडेला होर्डिग उभारण्याची परवानगी कुणी दिली आणि त्याला यातून किती पैसे मिळाले याबाबतची चौकशी एसआयटीद्वारे करण्यात येणार आहे. याशिवाय मुंबईत भावेश भिंडेच्या कंपनीने लावलेले होर्डिंग काढले जाणार आहेत. घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर अनेक शहरांतील महानगरपालिका सतर्क झाल्या असून बेकायदा होर्डिंग हटवण्यात येत आहेत.