डोंबिवली : सेवा संस्था तर्फे नागपंचमी निमित्ताने मॉडेल स्कूल या शाळेमध्ये सर्प या विषयावर मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सापांचे प्रकार, विषारी आणि बिनविषारी साप कसे ओळखायचे, सर्प दंश झाल्यास कोणते प्रथमोपचार केले पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
त्या शिवाय मुलांनी विचारलेल्या गैरसमज आणि अंधश्रद्धा या विषयी चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमात शाळेतील इयत्ता 6वी ते 10वी तील विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात सुमारे 55 ते 60 मुलांनी सहभाग घेतला होता.
शिक्षकांचे ही सहकार्य मिळाले. या कार्यक्रमात सौरभ मुळ्ये, मनिष पिंपळे आणि अमृता तोडके यांनी मार्गदर्शन केले.