मोठी बातमी! पुणे अपघातातील ३ आरोपींना पोलीस कोठडी

    22-May-2024
Total Views |
 
Pune accident
 
पुणे : विशाल अग्रवालसह पुणे अपघातातील ३ आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी सत्र न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी आरोपीचे वडिल विशाल अग्रवालसह तीन जणांना २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
पुण्यातील कलानगर परिसरात शनिवारी मध्यरात्री अपघात घडला असून यात दोन जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील आरोपी वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असून त्याने मद्यप्राशन करुन गाडी चालवली. याशिवाय त्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवानाही नव्हता.
 
हे वाचलंत का? - प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणं योग्य नाही! फडणवीसांचं राहूल गांधींना प्रत्युत्तर
 
मुलाकडे परवाना नाही हे माहित असताना आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनीच त्याला गाडीची चावी दिली. याशिवाय तो मद्यप्राशन करतो हेदेखील त्यांना माहिती होते. या घटनेनंतर विशाल अग्रवाल फरार झाले होते. मात्र, पुणे पोलिसांनी त्यांना अटक करुन बुधवारी सत्र न्यायालयात हजर केले.
 
यावेळी चार जणांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये विशाल अग्रवालसह पब मालकांचा समावेश आहे. पोलिसांनी न्यायालयाकडे ७ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. परंतू, न्यायालयाने येत्या २४ तारखेपर्यंत आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.