दिशादर्शक फलक अभावी पर्यटकांना चकवा !

मुंबईत येणाऱ्या मार्गांवर दिशादर्शक फलक लावण्याची मागणी

    22-Apr-2024
Total Views | 27

sign board


मुंबई, दि.२२ :
मुंबईत विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांसह पर्यटकांना सध्या चकव्याचा सामना करावा लागत आहे. शहरात सुरू असलेल्या कामांमुळे अनेक रस्त्यांवर दिशादर्शकच फलक नाहीत. त्यात गुगल मॅपद्वारेही अनेकदा वाहन चालक शहरात भरकटत आहेत. यामुळे वेळ तर वाया जातोच त्यासह इंधनही वाया जात आहे. त्यामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका शहरातील तुटलेली दिशादर्शक फलक काढून, त्या ठिकाणी नवीन फलक बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही ठिकाणी नव्याने दिशादर्शक फलक व वाहतूक चिन्हे बसवण्यात येणार आहेत. यासाठी येत्या वर्षभरात 60 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

मुंबई शहरात कामानिमित्त विशेषत: मंत्रालय आधी ठिकाणी राज्याच्या विविध शहरासह ग्रामीण भागातून हजारो नागरिक येत असतात. एवढेच नाही तर राज्यासह देशभरातून हजारो पर्यटक मुंबईला भेट देतात. यावेळी काही जण आपली वाहने घेऊन मुंबई देतात. पण मुंबईच्या प्रवेशद्वारातून आज शिरल्यानंतर अनेक ठिकाणी रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहन चालकांची फसगत होत आहे. अनेकदा आपले ठिकाण जवळ आलेले असताना वाहन चालकांना गोल गोल फिरावे लागत आहे. उदाहरणार्थ नवी मुंबईवरून येणारा नवका वाहन चालक चेंबूर शिवाजी चौकाकडे आल्यानंतर दक्षिण मुंबईत जाण्यासाठी फ्री वेचा वापर न करता, थेट शहरातून सायन, दादर, परळ या मार्गे जे. जे. उड्डाण पुलावरून दक्षिण मुंबईत जातो. यात त्याचा बराच वेळ वाया जातो.

गुगल मॅपच्या आधारे अनेक वाहन चालक आपल्या इच्छित स्थळी पोहचण्याचा प्रयत्न करतात. पण कमी वाहतूक असलेला रस्ता दाखवण्याच्या गुगलच्या प्रयत्नामुळे वाहन चालकांना चकव्याप्रमाणे मुंबईत फिरावे लागते. त्यामुळे प्रत्येक नाक्यावर उभारण्यात आलेले दिशादर्शक फलकच मुंबईकरांना या चकव्यातून बाहेर काढू शकतात. दरम्यान मुंबई महानगरपालिकेने शहरातील तुटलेली दिशादर्शक फलक काढून, त्या ठिकाणी नवीन फलक बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही ठिकाणी नव्याने दिशादर्शक फलक व वाहतूक चिन्हे बसवण्यात येणार आहेत. यासाठी येत्या वर्षभरात 60 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121