ईपीएफचा नवीन नियम : आता ५० हजार एवजी १ लाखांपर्यंत अँडव्हान्स पैसे काढू शकता

अँडव्हान्स घेण्याची आता ५० हजारांची मर्यादा वाढवत १ लाखांवर नेली

    19-Apr-2024
Total Views | 38

epfo
 
मुंबई: ईपीएफओ (Employee Provident Fund Organisation) ने ऑटो विथड्रॉव्हल नियमात बदल केले आहेत. आता ६८ जे परिशिष्ट नियमावलीबाबत १६ एप्रिलला नवीन परिपत्रक काढले आहे. परिपत्रकानुसार ६८ जे परिशिष्टात पात्रतेची मर्यादा ५० हजारांहून वाढवत १ लाख रुपये करण्यात आली आहे.१० एप्रिल २०२४ पासून हा बदल अमलात आणला जाणार आहे.
 
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार,परिच्छेद ६८ जे नुसार ईपीएफवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय खर्चासाठी अँडव्हान्सची मागणी करण्याची मुभा देण्यात आली आहे. इस्पितळाचा खर्च,अत्यावश्यक सेवा, इतर विकार व आजारांवरील इलाजासाठी संबंधित व्यक्ती ईपीएफओतून मूदत पूर्व पैसे मिळवू शकते. यासाठी आता पुन्हा कोणत्याही मेडिकल सर्टिफिकेट इतर कागदपत्रे,अर्ज यांची गरज लागणार नाही.
 
परिच्छेद ६८ न नुसार विकलांग व्यक्तींना सामग्री खरेदी करण्यासाठी अँडव्हान्स पैसे काढून घेता यावे यांची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे.या सेक्शन नुसार मात्र पैसे काढण्यासाठी वैद्यकीय कागदपत्रे व प्रमाणपत्रांची गरज लागणार आहे. जास्तीत जास्त काढून घेण्याची रक्कम मुळ पगार (बेसिक पे) व सहा महिन्यांचा डीए (Dearness Allowance) स्वतः काढलेली वर्गणी व व्याज अथवा सामग्रीची किंमत (दोन्हीपैकी जी किंमत कमी असेल) या प्रकाले काढता येणार आहे.
 
ऑनलाईन अर्जासाठी खालील प्रक्रिया करणे अपेक्षित - 
 
१) सदस्यांचे UAN credentials टाकणे अपेक्षित
 
२) UAN साठी केवायसी पडताळणी, पात्रता चाचणी व इतर माहिती पडताळणे
 
३) आवश्यक व अपेक्षित तो क्लेम करणे
 
४) UIDAI वरून आलेला ओटीपी व्हेरिफिकेशन करणे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121