कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) ने दि. २५ जून रोजी ईपीएफ ३.० सादर केले आहे, त्यात नमूद केल्याप्रमाणे इपीएफधारकांना एटीएम आणि यूपीआयद्वारे एक लाख रुपयांपर्यंत त्वरित पैसे काढणे सोपे झाले आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी चांगलीच सोय झाली आहे.
Read More
कर्मचारी भविष्य निधी संघटना(ईपीएफओ)मध्ये निव्वळ सदस्य संख्येत मोठी वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये १८.५३ लाख सदस्य ईपीएफओशी जोडले गेले असून यंदा ९.०७ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. या वाढीसह रोजगाराच्या संधींमध्ये वाढ आणि कर्मचारी लाभांविषयी जागरूकता वृध्दीचे द्योतक आहे.
भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) डेटा आणि ई-श्रम पोर्टल डेटा एकत्रित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय कामगार मंत्रालयाने घेतला आहे.
ईपीएफओ (Employees Provident Fund Organisation) संस्थेच्या नोंदणीत मोठी वाढ झाली आहे. विशेषतः महाराष्ट्रातील सदस्यांची सर्वाधिक वाढ ईपीएफओ झाल्याचे स्पष्ट झाले. संस्थेच्या नोंदणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने रोजगार निर्मितीत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिल महिन्यातील नोंदणीत १८.९२ लाख सदस्यांची वाढ झाली आहे. पेरोत माहितीत आतापर्यंत पोहोचलेली ही सर्वाधिक संख्या आहे. मार्च २०२४ मध्ये ३१.२९ टक्क्यांनी नोंदणीत वाढ झाली असल्याचे नोंदणीतील माहितीनुसार स्पष्ट झाले आहे.
कोविड काळातील अपवादात्मक परिस्थितीतील अँडव्हान्स सुविधा ईपीएफओ (EPFO) ने काढून घेतली आहे. कोविड काळात खात्यातील पुन्हा परतावा न मिळणारा अँडव्हान्स देण्याची सुविधा ईपीएफओने सुरू केली होती. एकूण फंडाच्या ७५ टक्के वाटा मुदतपूर्व काळात काढून घेण्याची सुरूवात संस्थेने सुरू केली होती.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बेरोजगारीत मोठी घसरण झाली आहे. कोविड काळानंतर प्रामुख्याने ही घट झाली असुन संघटित रोजगार निर्मितीत मोठी वाढ झाली आहे. ईपीएफओने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ईपीएफओचा पे रोलमध्ये झालेल्या वाढीत भर होताना काही सदस्य पुन्हा ईपीएफओ सोबत जोडले गेले असल्याचे म्हटले आहे.
ईपीएफओ (EPFO) नोकरदार माणसाला त्याचे आर्थिक भविष्य सुकर करण्यास मदत करते. भविष्यातील दीर्घकालीन निधी तरतूदीसाठी भविष्य निर्वाह निधी काही येतो. अशातच एक चांगली बातमी आली आहे. तुमचे ईपीएफओ खाते असल्यास तुम्हाला एक नवा फायदा होणार आहे.त्यातील एक तरतूद ' लॉयल्टी कम बेनिफिट प्रोव्हीजन ' या कायद्याच्या तरतुदीनुसार ईपीएफओचे खाते असल्यास तुम्हाला ५०००० रुपयांचा बोनस मिळणार आहे.या बेनिफिटसाठी पात्र होण्यास मात्र तुम्ही सलग २० वर्ष खातेदार असण्याची आवश्यकता असणार आहे.
The Employees Provident Fund Organisation (EPFO) आपल्या कर्मचाऱ्यांच्या एम्प्लॉइज प्रोव्हिडंट फंडमधील खात्यात व्याज जमा करण्याची शक्यता आहे.पात्र खात्यात हे व्याज जमा केले जाईल. एका व्यक्तीने सोशल मीडियावर ईपीएफओला विचारल्यानंतर त्यांचे उत्तर म्हणून 'ही प्रकिया चालू आहे.लवकरच खात्यात व्याज जमा केले जाईल व पूर्णपणे दिले जाईल त्यात कुठलेही नुकसान होणार नाही 'अशी प्रतिक्रिया दिलेल्या उत्तरात ईपीएफओने दिली आहे.
ईपीएफओ (Employee Provident Fund Organisation) ने ऑटो विथड्रॉव्हल नियमात बदल केले आहेत.आता ६८ जे परिशिष्ट नियमावलीबाबत १६ एप्रिलला नवीन परिपत्रक काढले आहे. परिपत्रकानुसार ६८ जे परिशिष्टात पात्रतेची मर्यादा ५० हजारांहून वाढवत १ लाख रुपये करण्यात आली आहे.१० एप्रिल २०२४ पासून हा बदल अमलात आणला जाणार आहे.
ईपीएफओने डिसेंबर महिन्यात तब्बल १५.६२ लाख नवीन सदस्य बनवले आहेत. ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाहनिधीच्या) अधिकृत पेरोल आकडेवारीनुसार ही विक्रमी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. डिसेंबरमध्ये झालेली सदस्य वाढ त्या आधीच्या तिमाहीतील सर्वाधिक वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात ११.९७ टक्के सदस्यत्वात वाढ झाली आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, चाकरमान्यांना मोठा ईपीएफओवर दिलासा मिळाला आहे. शनिवारी एम्प्लॉइज प्रोव्हिडंट फंड ऑरगॅनायझेशन ( ईपीएफओ) मुदत ठेवी व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. ८.१५ टक्क्यांवरून व्याजदर ८.२५ टक्के इतका वाढला आहे. ६५ लाख ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा फायदा जाहीर करण्यात असून ८.२५ टक्के व्याजदर व्हीपीएफ फंडासाठी देखील लागू होईल.
नवी दिल्ली - सोमवारी सरकारच्या कर्मचारी ईपीएफओ (भविष्य निधी संघटन) ने आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये ८.१५ टक्के इतका व्याजदर जमा करण्याचे आपल्या कार्यालयांना निर्देश दिले आहेत. भविष्यातील आर्थिक तरतूदी साठीच्या जमापूंजीवर साडेआठ टक्के व्याज घोषणा करुन पेन्शन धारकांना खूष केले आहे.
भविष्य निर्वाह निधीचे २०२२-२३ चे वार्षिक लेखा विवरण सेवार्थच्या https://sevaarth.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष प्रत (हार्ड कॉपी) देणे थांबविल्याचे महालेखाकार कार्यालयाने प्रसिद्धी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
केंद्रातील मोदी सरकारने तब्बल सहा कोटी कामगारांना पीएफच्या व्याजदरात घसघशीत वाढ करुन नवे आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच भेट दिली आहे.ईपीएफओने ईपीएफमधील ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आता पीएफ खातेदारांना ८.१५ टक्के व्याजदर मिळणार आहे. या निर्णयाचे कामगार जगतातून स्वागत करण्यात येत आहे.
पगारदारांच्या पगारातून दरमहा ‘कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी’ म्हणजेच ‘पीएफ’ दरमहा कापला जातो. त्यात तितकीच रक्कम मालकही घालतो आणि सेवानिवृत्तीनंतर हा निधी सेवानिवृत्ती पश्चात जीवन जगण्यासाठी परत मिळतो. नोकरीत असताना कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास हा निधी कायदेशीर वारसास मिळतो. पण, सेवानिवृत्तीनंतरचे जीवन जर सुसह्य व्हावे, स्वावलंबी असावे, असे वाटत असेल, तर नुसती ‘पीएफ’मधील गुंतवणूक पुरेशी नाही. वृद्धापकाळी वाढीव वैद्यकीय खर्च, प्रवास खर्च व अन्य खर्च भागवून सुस्थितीतील जीवन जगायचे असल्यास एका ‘पीएफ’वर अवलंबून च
नवी दिल्ली : केंद्रीय श्रम आणि कार्मिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO ने कोविड१९ शी लढा देण्याच्या कार्यात लाभार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी EPF म्हणजे भविष्य निर्वाह निधीच्या नियमात दुरुस्ती करुन, विशेष तरतुदीअंतर्गत, देशभरातील सुमारे १.३७ लाख दावे त्वरित म्हणजे १० दिवसांच्या आत निकाली काढले आणि २७९.६५ कोटी रुपयांचा निधी वितरीत केला.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतर्फे (EPFO) चालू आर्थिक वर्ष (२०१९-२०) साठी जमा रकमेवर १५ अंकांची कपात केली आहे. या वर्षासाठी व्याजदर ८.५० टक्के राहणार आहे. पूर्वी हा व्याजदर ८.६५ टक्के इतका होता. नोकरदार वर्गावर याचा थेट परिणाम जाणवणार आहे. त्यांच्या पगारातून जमा होणाऱ्या रक्कमेवर पडणार आहे. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत (सीबीटी) हा निर्णय घेण्यात आला आहे.
देशभरात जुलै महिन्यात एकूण १४.२४ लाख नवीन रोजगार निर्माण झाल्याची आकडेवारी कर्मचारी राज्य विमा निगमतर्फे (ESIC) जाहीर करण्यात आली आहे. देशातील ताज्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये १२.४९ लाख नव्या नोकऱ्या जाहीर झाल्या होत्या. राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने प्रसारित केलेल्या एका अहवालानुसार, २०१८-१९मध्ये ईएसआयसीसह एकूण १.४९ कोटी नोकरदारांची नोंदणी झाली आहे.
: कर्मचारी भविष्य संघटनेने (ईपीएफओ) २०१८-१९ या वर्षासाठी सहा कोटीहून अधिक सदस्यांना कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) ८.६६ टक्के व्याजदर लागू केला आहे. यापूर्वीचा दर ६.५५ टक्के इतका होता. केंद्रीय मंत्री सुशील गंगवार यांनी ही माहिती दिली
केंद्र सरकार पीएफच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पीएफचा सध्याचा असलेला ८.५५ टक्के व्याजदर कायम राहणार असून देशातील सहा कोटी पीएफधारकांना याचा फायदा होणार आहे.
पीएफ खातेधारकांसाठी एक खुशखबर आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) लवकरच आपल्या खातेधारकांसाठी गृहयोजना सुरू करणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफओ) सदस्याला आता महिनाभर बेरोजगार राहिल्यास ७५ टक्के पीएफ काढता येणार आहे.