मुंबई: आंतरराष्ट्रीय सोन्याच्या दरात वाढ झाल्याने भारतात सोन्याने नवा विक्रम रचला.आज दुपारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोल्ड स्पॉट दरात ०.५८ अंशाने वाढ झाली आहे. युएस गोल्ड फ्युचर १.७७ टक्क्यांनी वाढला होता. परिणामी भारतातील एमसीएक्स निर्देशांकात तब्बल १.५८ टक्क्यांनी वाढत सोने एमसीएक्सवर ७२७७५.०० पातळीवर पोहोचले आहे.
देशातील सरासरी सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. देशातील २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम किंमत ६७२०० रुपयांवर पोहोचली आहे. प्रति १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत १००० रूपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या प्रकारातील १० ग्रॅम सोन्याचे दर ७३३१० रुपयांवर पोहोचले आहेत.१० ग्रॅम सोन्याच्या दरात १०९० रुपयांनी वाढ झाली आहे.१८ कॅरेट सोन्याच्या दरात १० ग्रॅमची किंमत ५४९८० रुपयांवर पोहोचली आहे.
मुंबईत सोन्याची किंमत २२ कॅरेट प्रकारात १० ग्रॅमची किंमत ६७२०० रुपयांवर पोहोचली आहे.२२ कॅरेट प्रति १० ग्रॅम किंमतीत १००० रूपयांनी वाढ झाली आहे.२४ कॅरेट सोन्याच्या दरात १०९० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम किंमत ७३३१० रुपयांवर पोहोचली आहे.
महागाई दर निकालानंतर आज युएस डॉलर रुपयांच्या तुलनेत वधारला गेल्याने आज सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.