बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार

१७ टक्के पगारवाढ करण्याचा प्रस्ताव बैठकीत मंजूर

    09-Mar-2024
Total Views | 133

Bank Salary
 
(Salary Hike in PSU Bank Employees)
 
मुंबई: बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची मागणी अखेरीस पूर्ण होणार असून यासंबंधी निकाल बँक कर्मचारी युनियनने बैठक जाहीर झाला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात १७ टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे या बैठकीत ठरले आहे. निगोशिएटिंग कमिटी ऑफ इंडियन बँक असोसिएशन (आयबीए) व बँक अधिकारी असोसिएशन व कामगार युनियन यांच्या संयुक्त बैठकीत हा निष्कर्ष काढण्यात आला असून पब्लिक सेक्टर युनिट (PSU Bank) बँकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार आहे.
 
 
आयबीए (IBA)आणि संघटनांनी बँकिंग उद्योगासाठी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत सर्व शनिवार सार्वजनिक सुटी म्हणून घोषित करण्याबाबत एक समझोता केला गेला आहे. आणि, IBA ने त्यानुसार सरकारला याची शिफारस केली आहे. अंतिम निर्णय शासन व आरबीआयकडून घेतला जाईल. याशिवाय स्टाफ वेल्फेअर स्कीम (Staff Welfare Scheme)अंतर्गत कर्मचाऱ्यांचे आरोग्य, व संकटकालीन मदत यासाठी ही योजना लागू होऊ शकते. विशेषतः संकटकाळात व आरोग्याची समस्या असल्यास रजांचे नियोजन व उरलेल्या रजांचे चलनीकरण (Monetization) याबाबत या बैठकीत निर्णय घेतला गेला आहे.
 
जवळच्या नातेवाईकांच्या मृत्युनंतर रजा यासंदर्भात यावर बैठकीत विचार विनिमय झाला असून रजांचे व्यवस्थापन हे बँकेतील स्थानिक पातळीवरील निर्णयात ठरवले जाऊ शकते.१२ PSBs व्यतिरिक्त, १० खाजगी क्षेत्रातील बँका वेतन सेटलमेंटचा भाग आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121