दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना चाप बसणार !

चुकीच्या जाहिरातींवर निर्बंध घालण्यासाठी ASCI ने CCPA शी हातमिळवणी केली

    27-Mar-2024
Total Views | 61

ASCI
 
मुंबई: The Advertising Standards Council of India (ASCI) ने Central Consumer Protection Authority (CCPA) शी हातमिळवणी केल्याचे जाहीर केले आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना चाप बसवण्यासाठी कडक निर्बंध घालण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. विशेषतः सीसीपीए (CCPA) ने एएससीआय (ASCI) ला दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आपल्याकडे पाठवण्याची विनंती केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या जाहिरातींवर कारवाई होऊ शकते.
 
यासंबंधीचे तक्रार आलेल्या जाहिरातींवर कारवाई करण्यासाठी आवश्यक अधिकार ग्राहक संरक्षण नियामक मंडळाकडे आहेत. त्यामुळे Consumer Protection Act (ग्राहक संरक्षण कायदा २०१९) अंतर्गत नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी तत्सम कंपन्यांवर कारवाई होणार असे जाहीरनाम्यातही म्हटले आहे.
 
यावर प्रतिक्रिया देताना, 'समान उद्दिष्टांसह, CCPA आणि ASCI कोणत्याही उल्लंघनांना प्रभावीपणे संबोधित केले जातील याची खात्री करण्यासाठी पूरक मार्गांनी काम करू शकतात. डिजिटल जाहिरातींद्वारे नवीन आव्हाने निर्माण केली जात आहेत,आणि गती राखण्यासाठी समविचारी संस्थांसह सहयोगी दृष्टिकोनाची आवश्यकता आहे," असे ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहितकुमार सिंग म्हणाले.
 
"स्वयं-नियामकांसोबत जवळून काम करणाऱ्या नियामकांनी स्थापित केलेली सर्वोत्तम पद्धत आहे आणि आम्हाला आशा आहे की या भागीदारीमुळे भारतीय जाहिरातींचे नियमन अधिक प्रभावी होत जाईल," असेही ते पुढे म्हणाले.
 
अग्रलेख
जरुर वाचा
एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

राज्याच्या अनेक भागात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या बसेसच्या झालेल्या दूरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एस.टी. बसेस बाबत वारंवार नागरिक व लोकप्रतिनिधी यांचेकडून शासनाकडे निवेदन वा तक्रार करुनही नवीन बस खरेदी व बस स्थानकामध्ये सुधारणा करण्याबाबत कोणतीही प्रभावी उपाययोजना व त्याची अंमलबजावणी का करण्यात येत नाही, असा सवाल राज्याच्या विविध भागातील आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसेसची कमतरता भरुन काढण्यासाठी रा.प. महामंड..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121