मुंबई: भारतातील बांधकाम आणि पायाभूत सुविधा कंपनी, विष्णुसूर्या प्रोजेक्ट्स अँड इन्फ्रा लिमिटेडने हिताची झोसेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि एजी एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी धोरणात्मक सामंजस्य करार करून कचरा व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश केला आहे.पायाभूत सुविधांच्या विकास उद्योगक्षेत्रातील अनुभवी संस्था असल्याने, विष्णुसूर्या प्रोजेक्ट्स आणि इन्फ्रा लिमिटेड कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
हिताची झोसेन इंडिया ही जागतिक पातळीवर कचरा व्यवस्थापन उद्योगातील कंपनी हिताची झोसेन कॉर्पोरेशनची भारतीय उपकंपनी आहे. मुंबईमध्ये स्थित आणि भारतभर कार्यरत असलेली एजी एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातील आघाडीची कचरा व्यवस्थापन कंपनी आहे.
ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन (जीसीसी) परिसरात दररोज प्रचंड प्रमाणात घनकचरा तयार होतो, ज्यापैकी फक्त २०% कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. पेरुंगुडी डम्पिंग ग्राउंड आणि कोडुंगयूर डम्पिंग ग्राउंडवर ५२०० मेट्रिक टनपेक्षा जास्त कचरा टाकला जातो, ज्यामुळे या साइट्सवर दबाव पडतो आणि संभाव्य पर्यावरणीय धोके निर्माण होतात. शहरामध्ये प्रभावी कचरा प्रक्रियेसाठी पुरेशा पायाभूत सुविधा नाहीत आणि वाढत्या लोकसंख्येमुळे सध्याच्या कचरा व्यवस्थापन व्यवस्थेवर अधिक ताण पडत आहे.
चेन्नईतील कचरा व्यवस्थापनाच्या या गंभीर आव्हानाला सामोरे जाण्याच्या उद्देशाने विष्णुसूर्या प्रोजेक्ट्सने या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.आपल्या भागीदारांसह, ही कंपनी चेन्नईमधील कचरा व्यवस्थापनासाठी शाश्वत उपाय विकसित करण्यावर आणि त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करेल.
विष्णुसूर्या प्रोजेक्ट्स अँड इन्फ्रा लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सनल कुमार म्हणाले,“कचरा व्यवस्थापनाच्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी शाश्वत उपाय आणणे महत्त्वाचे आहे. कचऱ्यामधून ऊर्जा उत्पन्न करण्याच्या तंत्रज्ञानातील आमच्या व भागीदारांच्या कौशल्यांचा लाभ घेऊन आणि चेन्नईच्या १००% कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये योगदान देणे आमचे लक्ष्य आहे. आम्हाला आशा आहे की ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनसोबत सहयोग करून आम्ही शहरासाठी स्वच्छ व पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकू."