"जेएनयू मै सरकार जिसकी होगी...", बहुचर्चित JNU चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

    19-Mar-2024
Total Views | 63
'जेएनयु' चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून यात एक मराठमोळा अभिनेता झळकणार आहे.
 

jnu movie 
 
मुंबई : बहुचर्चित 'JNU - जहांगीर नॅशनल युनिवर्सिटी' (JNU Movie) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेला हिची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'JNU - जहांगीर नॅशनल युनिवर्सिटी' (JNU Movie) या चित्रपटचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे राजकीय विचार आणि त्यांनी बाजू मांडण्याचा शिवाय JNU बद्दल अनेक गोष्टी मांडण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचे टीझरवरुन दिसत आहे.
 
'JNU - जहांगीर नॅशनल युनिवर्सिटी' चित्रपटाच्या टीझरमध्ये महत्त्वाची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. यात युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थी आंदोलन करताना दिसत असून त्यांच्या तोंडी "जेएनयू मै सरकार जिसकी होगी, देश का फ्युचर वही डिसाइड करेगा", "यहा के मगरमच्छ हम है, इसलिए हमारे साथ रहने मे ही समझदारी है" अशा घोषणा ऐकू येत आहेत. या टीझरमुळे चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे यात शंका नाही.
 

siddhrath bodke 
 
'JNU - जहांगीर नॅशनल युनिवर्सिटी' या चित्रपटात एक मराठमोळा अभिनेता देखील दिसत आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडके यात महत्वाचा भूमिकेत दिसणार असून टीझरमध्ये तो दिसत आहे. सिद्धार्थने या चित्रपटात युनिव्हर्सिटीमधील एका विद्यार्थ्याची भूमिका साकारली असून टीझरमध्ये तरी तो आक्रमक दिसत आहे. ५ एप्रिल रोजी देशभरात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रश्मी देसाई, पियुष मिश्रा, रवी किशन, अतुल पांडे असे अनेक कलाकार दिसणार आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121