केंद्रीय गृह मंत्रालयाकडून "CAA 2019" अॅप लाँच!

    16-Mar-2024
Total Views | 30
CAA 2019 App Launched
 
 
नवी दिल्ली :  केंद्र सरकारने देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा(CAA) लागू करण्यासंदर्भात अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनंतर सुधारित नागरिकत्वासाठी पात्र नागरिकांना अर्ज करण्यासाठी स्वतंत्र अॅप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अर्ज करण्याकरिता CAA मोबाइल ॲप लाँच केले आहे.


 
दरम्यान, सीएए कायद्यांतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील गैर-मुस्लिम निर्वासित या अॅपच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत. सदर 'CAA 2019' अंतर्गत नागरिकत्व मिळविण्यासाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने एक ॲप जारी केले आहे. या ॲप लॉन्चची घोषणा गृह मंत्रालयाने केली होती, त्यानंतर अखेर 'CAA-2019' ॲप लॉन्च करण्यात आले आहे.

'CAA-2019' अंतर्गत नागरिकत्व मिळविण्यासाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने एक ॲप जारी केले आहे. सीएए कायद्यांतर्गत भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी पात्र अर्जदारांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मोबाइल ॲप लाँच केले आहे. याद्वारे, अर्जदार नागरिकत्व (सुधारणा) कायदा, 2019 अंतर्गत भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. सदर ॲप तुम्ही Google Play Store किंवा Indiancitizenshiponline.nic.in या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता.
 
“नागरिकत्व (सुधारणा) कायदा, 2019 अंतर्गत अर्ज करण्यासाठी ‘CAA-2019’ मोबाइल ॲप कार्यरत झाले आहे,” गृह मंत्रालयाने सांगितले. यापूर्वी, गृह मंत्रालयाने CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास पात्र लोकांसाठी पोर्टल सुरू केले होते.

 
भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास लिंक खालीलप्रमाणे -
https://indiancitizenshiponline.nic.in/
 
 
ॲप प्ले स्टोअरवरून खालील लिंकद्वारे डाउनलोड करा
- https://play.google.com/store/apps/details?id=ca.caa.coremobileapp&hl=en&gl=US.




अग्रलेख
जरुर वाचा
अटल सेतु सह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

अटल सेतु सह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याची धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने घेतले होते. त्यानुसार २१ ऑगस्टपासून अटल सेतू सह मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121