महानायक अमिताभ बच्चन यांनी गेली अनेक दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या तब्येतीबद्दल महत्वाची बातमी समोर आली आहे. आज १६ मार्च रोजी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर (Amitabh Bachchan) अँजिओप्लास्टी झाली. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया झाली आहे.
अमिताभ बच्चन सोशल मिडियावर कायमच सक्रिय असतात. देशात घडणाऱ्या विविध विषयांवर ते आपली मतं मांडत असतात. त्यांची अँजिओप्लास्टी झाल्यानंतर देखील त्यांनी स्वत: ट्विट करत म्हटले आहे की, “नेहमी आभारी असेन”.
हिंदी चित्रपटसृष्टीतील एन्ग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांचे सर्व वयोगटातील चाहते आहेत. वयाच्या ८० व्या वर्षातही ते प्रमूख भूमिका साकारत प्रेक्षकांच्या आश्चर्यचकित करतात. त्यामुळे त्यांच्याकडून या पुढे देखील अधिक चित्रपट यावेत अशी इच्छा त्यांचे चाहते कायमच व्यक्त करत असतात.