"ती मजार काढून टाका अन्यथा..."; राणेंचा थेट इशारा

    29-Feb-2024
Total Views | 103

Nitesh Rane


मुंबई :
नाशिकच्या चांदवड येथे राष्ट्रीय महामार्गावर मजार बांधली जात असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. तसेच ही मजार काढून टाका अन्यथा त्याच्या बाजूला बजरंगबलीचे मंदिर उभे करु असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
नितेश राणे म्हणाले की, "नाशिक हायवेवर मजार बांधली जात असून रस्त्यात हिरवी चादर टाकण्यात आली आहे. कहर म्हणजे यासाठी मालेगाववरुन मौलानाला बोलवण्यात गेले असून त्याला साळुंखे नावाच्या अधिकाऱ्याने २० हजार रुपये दिले आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
 
ते पुढे म्हणाले की, "हे लांगुलचालनाचे प्रकार आमच्या सरकारमध्ये चालणार नाही. त्यामुळे हे मजारच्या नावाने केलेलं काम काढून टाका अन्यथा आम्ही केंद्र सरकारकडे तक्रार करु. आम्ही स्वत: नितीन गडकरींकडे जाऊन सांगू की, या मजारवर लवकरात लवकर बुलडोझर चालवून काढून टाका. अन्यथा आम्ही त्याच्या बाजूला बजरंगबलीचं मंदिर उभं करु. ही मजार उठवली नाही तर आम्ही तिथे बजरंगबलीची मुर्ती आणून बसवू," असा इशारा त्यांनी दिला आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121