सोने चांदी महागली एमसीएक्सवरही सोने निर्देशांकात वाढ !

मुंबईत २२ कॅरेट प्रकारात सोन्याचा दर प्रति ग्रॅम ५७६० रूपये व २४ कॅरेट प्रकारात सोन्याचा दर ६२७४ रुपये प्रति ग्रॅम

    21-Feb-2024
Total Views | 43

Gold Silver
 
मुंबई: देशात सोने चांदी अखेर महागली आहे. सोन्याच्या निर्देशांक ९० अंशाने वाढत ६२३६० रूपये प्रति १० ग्रॅम व चांदीचा निर्देशांक ११० अंशाने वाढत ७१६८० प्रति किलोपर्यंत वाढला आहे. आज अंदाजे सोन्याच्या भावात वाढ होऊन ५७६० रूपये प्रति ग्रॅमने सराफ बाजारात विकले जात आहे. विशेषतः मुंबईत आज सोन्याचा दर २२ कॅरेट सोन्याच्या प्रकारात प्रति ग्रॅम ५७६० रूपये ठरला आहे. २४ कॅरेट प्रकारात ६२७४ रुपये प्रति ग्रॅमने सोने महागले आहे.
 
'गुड रिटर्न्स ' या संकेतस्थळावरील माहितीनुसार, काल २२ कॅरेट प्रकारच्या सोन्याच्या किंमत ५७३५ प्रति ग्रॅमवरून आज ५७६० झाली आहे. १० ग्रॅमवरील सोन्याच्या किंमतीत कालच्या प्रति ग्रॅम ५७३५० रूपयांवरून आज ५७६०० रूपये प्रति ग्रॅम वाढ झाली आहे.
 
२४ कॅरेट प्रकारच्या सोन्याच्या भावात देखील दरवाढ पहायला मिळाली आहे. प्रति १ ग्रॅम सोन्याची किंमत कालच्या ४६९२ रूपयांच्या तुलनेत आज ४७१३ रूपयांवर पोहोचली आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत कालच्या ४६९२० वरून ४७१३० रूपयापर्यंत पोहोचली आहे.
 
मुंबई गेल्या दहा दिवसात साधारणपणे २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ५७३५ रूपये प्रति ग्रॅम व २४ कॅरेट सोन्याचा भाव ६२५५ रूपये प्रति ग्रॅम इतका आहे.
 
चांदीच्या भावातदेखील वाढ 
 
देशातील चांदीच्या भावात देखील आज ०.२० अंशाने वाढ पहायला मिळाली आहे. चांदीचा निर्देशांक सकाळपर्यंत ७१६८० पर्यंत पोहोचला होता. चांदीचा भाव कालच्या १ ग्रॅमवर ७५.५० वरून ०.२० अंशाने वाढत ७५.७० पर्यंत पोहोचला आहे. एक किलो चांदीत कालच्या ७५५०० वरून २०० अंशाने वाढ होत ७५७०० पर्यंत पोहोचला आहे.
 
विशेषतः मुंबईत १० ग्रॅम चांदीचा दर ७५७ रूपये व एक किलो चांदीचा दर ७५७०० रुपये इतका आहे. गेल्या दहा दिवसात चांदीच्या भावात सरासरी २०० अंशाने वाढत एक किलोकरिता ७५७०० रूपये होता.
 
गोल्ड इंडिया एमसीएक्सवर सोन्याचा निर्देशांकांचा उच्चांक ६२२२५ पर्यंत पोहोचला व चांदीच्या एक किलो निर्देशांकात ७१४६० पर्यंत पातळी गाठली गेली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121