राहुल गांधींनी केली तोतया महंताकडून काशीविश्वनाथाची पूजा
काशी विश्वनाथ न्यासाचे स्पष्टीकरण
19-Feb-2024
Total Views | 63
नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी तोतया महंताकडून काशी विश्वनाथाची पूजा केली आहे, असे स्पष्टीकरण काशी विश्वनाथ न्यासाकडून करण्यात आले आहे.काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशात आहे. यादरम्यान, त्यांनी वाराणसी येथील काशी विश्वनाथाची पूजा केल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे. काशी विश्वनाथ मंदिरातील महंत राजेंद्र तिवारी यांनी राहुल गांधी यांना काशी विश्वनाथाच्या गर्भगृहात नेऊन तेथे पूजा केल्याचा दावा काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. मात्र, काँग्रेस आणि राहुल गाधींचा हा दावा सपशेल खोटा असल्याते काशी विश्वनाथ न्यासातर्फे सांगण्यात आले आहे.
काशी विश्वनाथ मंदिर न्यासाने म्हटले आहे की, गर्भगृहातील पूजेसाठी अर्चकांची नियुक्ती श्रीकाशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टद्वारे केली जाते आणि केवळ नियुक्त अर्चक मंदिराच्या गर्भगृहात पूजा करतात. श्रीकाशी विश्वनाथ मंदिरात महंत नावाचे कोणतेही पद नाही किंवा त्या पदावर कोणाची नियुक्तीही नाही. त्यामुळे मंदिरामध्ये राजेंद्र तिवारी नामक व्यक्तीकडून कोणताही संकल्प अथवा पूजन करण्यात आलेले नाही, असे न्यासातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांनी खरोखरच काशी विश्वनाथाची पूजा केली आहे की नाही, असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.