काँग्रेसला मोठा धक्का! अशोक चव्हाणांनी दिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा!

    12-Feb-2024
Total Views | 202
 
Ashok Chavhan

मुंबई : कांग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 
दुसरीकडे, मुंबईतील भाजप कार्यालयात एका पक्षप्रवेशाची तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. अशोक चव्हाणांनी आधी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांची भेट घेत त्यांना विचारपूस केल्याचे सांगण्यात येत आहे.
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच माजी मंत्री बाबा सिद्दीकी आणि मिलिंद देवरा या दोन नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाणांसारख्या बड्या नेत्याचा राजीनामा हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्र काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!; भारताचे पाकवर टीकास्त्र

"ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!"; भारताचे पाकवर टीकास्त्र

(India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121