हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; बीडीडीएस पथकाकडून पहाणी सुरु

धमकीवजा मेलमुळे नागपुरात एकच खळबळ

    09-Dec-2024
Total Views | 35
Dwarkamai

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरच्या गणेशपेठ बसस्टॅंडजवळच्या द्वारकामाई हॉटेलमध्ये ( Hotel ) बॉम्ब ठेवल्याची धमकी वजा सूचना दि. ९ डिसेंबर रोजी ई-मेलच्या माध्यमातून देण्यात आली. या बातमीने नागपूरात खळबळ उडाली. पोलिसांसह बीडीडीएस पथक आणि अग्निशमन दलदेखील घटनास्थळी तपास करीत आहेत.

नागपूरातील गणेशपेठ बसस्टॅंड हा गर्दीचा भाग आहे. द्वारकामाई हे हॉटेल बसस्टॅंडनजीक असून याठिकाणी रहदारी कायम असते. मेलच्या माध्यमातून आलेल्या धमकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच तातडीने तपासणी सुरु करण्यात आली. मिळालेल्या धमकीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने द्वारकामाई हॉटेलमध्ये थांबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले व हॉटेलची तपासणी करण्यात आली. बीडीडीएस पथकासह पोलिस, अग्निशमन दलदेखील ही तपासणी करीत आहेत. मात्र आतापर्यंत काहीही हाती लागलेले नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार द्वारकामाई हॉटेलला हा धमकी वजा मेल पहाटे आला. हा मेल गांभीर्याने घेत हॉटेल मॅनेजमेंटने सकाळीच पोलिसांना याची कल्पना दिली व सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी तात्काळ तपासणी सुरु केली. अद्याप कोणतीही संशयास्पद गोष्ट सापडलेली नाही; परंतु सध्या विमानात बॉम्ब ठेवलेल्याच्या अफवा देखील मोठ्या प्रमाणात पसरलेल्या दिसून आल्यात. या अफवांकडे दुर्लक्ष न करता त्यावर योग्य ती तपासणी आणि चौकशी पोलिसांकडून होत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121