चिन्मय कृष्ण दास यांची प्रकृती गंभीर; सरकारने वैद्यकीय सेवाही नाकारली

    31-Dec-2024
Total Views | 70

Chinmay Krishna Das

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Chinmay Krishna Das Health)
बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर येथील इस्लामिक कट्टरपंथींकडून हिंदू अल्पसंख्याकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न मोठ्याप्रमाणात झाला. इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा खोटा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिन्मय कृष्ण दास यांची प्रकृती गंभीर असून वैद्यकीय सेवाही नाकारली जात आहे. त्यामुळे बांगलादेशी हिंदू गट आता चिन्मय कृष्ण दास यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याबाबत साऱ्या जगाला आवाहन करत आहे.

हे वाचलंत का? : २०२४ ठरले राष्ट्रसंकल्पाचे वर्ष : राम मंदिर ते विकसित भारत २०४७

बांगलादेशी बंगाली हिंदू अधिकार गट 'बांगलादेश शोमिलितो सनातन जागरण जोते' यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, चिन्मय कृष्ण प्रभू यांची प्रकृती गंभीर असून त्यांना सरकारकडून योग्य उपचार मिळत नाहीत. त्यांना दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे ते लवकर बरे व्हावे, याकरीता बांगलादेशातील प्रत्येक मंदिरात दि. १ जानेवारी २०२५ रोजी प्रार्थना करण्यात येणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे यांचे देहावसान

राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे यांचे देहावसान

राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे (९७) यांचे गुरुवार, दि. ३१ जुलै रोजी देहावसान झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचे देहदान शुक्रवार, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता एम्समध्ये केले जाईल. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि १५ दिवसांपासून त्यांची तब्येत आणखी बिघडत चालली होती. वंदनीय प्रमिलताईंचे संपूर्ण जीवन अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक होते. कठोर परिश्रम करणाऱ्या महामेरू प्रमिलताई शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रीय विचारांशी एकरूप राहिल्या...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121