कोपरगावात अज्ञातांकडून मंदिरांची तोडफोड; नंदीसह भगवान शंकराच्या मूर्तीची विटंबना

    24-Dec-2024
Total Views | 50

Kopargaon Temple Attack

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Kopargaon Temple Attack) 
अहिल्यानगरच्या कोपरगाव भागातील हिंदू समुदायाच्या सदस्यांनी शहरातील दोन हिंदू मंदिरांची तोडफोड करणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरोधात तीव्र निदर्शने केली आहेत. त्यांच्या अटकेची मागणी हिंदू समुदायाकडून होत आहे. रविवार, दि. २२ डिसेंबर रोजी परिसरातील भुवनेश्वर महादेव मंदिरात अज्ञात चोरट्यांनी घुसून शिव आणि नंदीच्या मूर्तीची तोडफोड केली होती. या घटनेमुळे हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली असून न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे.

हे वाचलंत का? : कशी बदलली संभलची डेमोग्राफी?

स्थानिक वृत्तानुसार, स्थानिक हिंदू श्रीरामपूर-कोपरगाव रस्त्यावर जमले आणि त्यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी एका विशिष्ट समाजाच्या दोन जणांनी मंदिरावर जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तोडफोड करण्यात आलेल्या हिंदू मूर्तींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये भगवान शंकर आणि नंदीच्या मूर्तीची विटंबना केल्याचे दिसते आहे.

हिंदू आंदोलकांनी रास्ता रोको करून न्यायाची मागणी केल्याने परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे, परिसरातील ही दुसरी घटना आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील पुणतांबा परिसरात भगवान हनुमानाच्या मंदिराची तोडफोड करण्यात आली होती.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121