दिव्यांग चेतन पाशिलकरला दिल्लीमधील राष्ट्रीय ॲबिलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक

    19-Dec-2024
Total Views | 16

Handicaped Chetan Pashilkar
ठाणे : ठाण्यातील आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता दिव्यांग चित्रकार चेतन पाशिलकरने दिल्लीमधील राष्ट्रीय ॲबीलिंपीक (Abylimpic) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
 
चेतन पाशीलकर हे मुक आणि कर्णबधिर आहेत. शालेय जीवनापासूनच चित्रकला या विषयात चेतन पारंगत असून २०१८ सालीही त्यांनी राष्ट्रीय ॲबीलिंपीक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते.नुकतेच त्यांनी दिल्ली येथे झालेल्या नॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. त्यांच्या यशामुळेच २०२७ या वर्षात फिनलॅण्डमध्ये होणार्‍या अकराव्या आंतरराष्ट्रीय ॲबिलिंपीक स्पर्धेत त्यांची पुन्हा निवड झाली आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या स्पर्धेमध्ये दिव्यांगाच्या पुनर्वसनावर आधारित ३३ वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आहेत यात क्राफ्ट, आयसीटी व सर्विसेस अशा तीन विभागात प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा क्रमाने स्पर्धा होत असतात.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121