मुंबई, दि.१७ :प्रतिनिधी ‘वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४’ आणि ‘कासारवडवली-गायमूख मेट्रो ४ अ’ मार्गिकांवरील १०० टन वजनाच्या या चार गर्डर बसविण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण करण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला यश आले. यामध्ये ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांवरील कापूरबावडी आंतर बदल स्थानकाच्या कामांतर्गत चार यु गर्डर यशस्वीपणे बसविण्यात आल्या आहेत. प्रत्येक १०० टन वजनाचे चार गर्डर बसविण्यासाठी आठ तास लागले असल्याची माहिती एमएमआरडीएने दिले आहे.
‘एमएमआरडीए’ने ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’चे काम हाती घेतले आहे. नुकतेच या मार्गिकेतील अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक काम ‘एमएमआरडीए’ने पूर्ण केले. ‘एमएमआरडीए’ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रोचे लाईन-४च्या बांधकाम दरम्यानचा आणखी एक माईलस्टोन! १४ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री ११ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत कापूरबावडी इंटरचेंज स्टेशनच्या सेंट्रल ग्रीडचे (जी५-जी६) पहिले ४ यू-गर्डर्स (प्रत्येकी सुमारे १०० टन वजनाचे) यशस्वीरित्या उभारण्यात आले. तत्वज्ञान विद्यापीठ जंक्शनवरील या स्थानकाची दुहेरी-रुंदीची रचना असून, जी मोठ्या प्रवासी संख्येला नियंत्रित करण्यास मदत करेल व मेट्रो मार्ग-४ आणि ५ एकत्रित जोडण्याचे काम देखील करेल. घोडबंदर रोडवरील गुंतागुंतीची बांधकामे व अवजड वाहतूक योग्यरित्या हाताळून डी.सी.पी. वाहतूक ठाणे शहर यांच्या सहकार्याने हे काम ८ तासांत पूर्ण करण्यात आले. बसविण्याच्या कामादरम्यान घोडबंदर रोडवरील अवजड वाहतूक नियंत्रित करून हे काम पूर्ण करण्यात आले.