विरुष्काच्या लेकाने गुगलवर केला कब्जा, २०२४मध्ये सर्वात जास्त सर्च केलं गेलं अकायचं नाव

    12-Dec-2024
Total Views | 48
 
virushka
 
 
मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली २०२४ मध्ये पुन्हा एकदा आई-बाबा झाले. अनुष्काने फेब्रुवारीत मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव विरुष्काने अकाय ठेवले. दरम्यान, एकीकडे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मुलं सोशल मिडियावर फार प्रसिद्ध आहेत. तर अनुष्का आणि विराटने आपल्या दोन्ही मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. ज्यावेळी अनुष्काने आपल्या मुलाचे नाव अकाय असल्याचे जाहीर केले होते त्यानंत सोशल मीडियावर त्या नावाचा अर्थ शोधण्याचा सपाटाच सुरु झाला होता. अकाय विराट कोहलीच्या नावाचा अर्थ गुगलवर इतका शोधला गेला की त्याने २०२४ या वर्षासाठी गुगलच्या सर्चमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. अकाय नावाचा अर्थ हे सर्च गुगलवर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 
तर, मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, अकाय हा तुर्की मूळचा हिंदी शब्द असून हा शब्द कायापासून बनला आहे - ज्याचा अर्थ शरीर असा होतो. तर संस्कृतमध्ये, अकाय म्हणजे 'कोणतीही गोष्ट किंवा अशी वस्तू म्हणजे शरीराशिवायचं रुप. तर त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव वामिका असं आहे. त्यामुळे दोन्ही मुलांची अशी वेगळी नावं ठेवल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण होत आपल्याही मुलांची नावं ती ठेवावीत असा आग्रह केला गेला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

“सध्याच्या काळातील संघर्ष बघता, सगळ्या घटनांकडे एका सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. यासाठी सांस्कृतित राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा “ असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ४ ऑक्टोबर रोजी वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल यांनी लिहिलेल्या आणि दिलीपराज प्रकाशन नें प्रकाशित केलेल्या "पार्थसूत्र" या मराठी आणि "Bow & Beyond" या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भानुबाई नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे पार पडले. या कार्यक्र..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121