पत्रकारावर भडकला राजपाल यादव; हिंदुंच्या भावना दुखावणाऱ्या त्या व्हिडिओबद्दल प्रश्न विचारताच संताप अनावर

    05-Nov-2024
Total Views | 99
 
rajpal yadav
 
 
मुंबई : अभिनेता राजपाल यादव यांनी आजवर विविध हिंदी चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या भूल भुलैया ३ चित्रपटात तो झळकला होता. चित्रपटामुळे तर राजपाल यादव चर्चेत आहेच पण दिवाळीबद्दल एक व्हिडिओ करत हिंदु समाजाच्या भावना दुखावल्यामुळे राजपाल यादवची विशेष चर्चा सुरु आहे. याच विषयाबद्दल राजपाल यादवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पत्रकाराचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पत्रकाराने राजपाल यादव यांना एक प्रश्न विचारला, ज्यानंतर त्याचा रागाचा पारा चढला आणि त्याने पत्रकाराचा कॅमेरा खेचण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
 
राजपाल यादवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे, ज्यामध्ये तो पत्रकारावर भडकल्याचं दिसत आहे. पत्रकाराने त्यांना दिवाळीबद्दलच्या व्हिडिओबद्दल प्रश्न विचारल्यावर यादवने पत्रकाराचा कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे.
 
 
 
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजपालने दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन करत एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तेव्हापासून त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. दरम्यान,राजपाल यांनी हिंदुंना दिवाळीबद्दल दिलेल्या सल्ल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले होते. शिवाय त्यांच्या या वक्तव्यानंतर ख्रिस्ती पॅस्टर यांच्यासोबत चिकन बिर्याणीच्या जाहिरातीत झळकले होते; ज्यात बिर्याणी बाय किलो साठी त्यांनी ही जाहिरात केली होती. पण त्यांनी हिंदुंच्या भावना दु:खावल्यामुळे लोकांनी त्यांना या जाहिरातीतून त्यांच्या जुन्या वक्तव्यांची आठवण करुन दिली होती.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121