आमदार कालिदास कोळंबकर यांना बहुमताने विजयी करण्याचा संकल्प
03-Nov-2024
Total Views | 63
1
मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई सचिव शिवा चौहान ( Shiva Chauhan ) यांनी नुकताच आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. वडाळा विधानसभेचे आमदार तथा महायुतीचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांना बहुमताने विजयी करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.
'दै. मुंबई तरुण भारत'शी बोलताना शिवा चौहान म्हणाले, गेली १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निष्ठेने काम केले. सामान्य कार्यकर्ता, वॉर्ड अध्यक्ष, विभाग अध्यक्ष ते मुंबई सचिव अशी पदे सांभाळली. परंतु, गेल्या काही वर्षांपासून कामे करण्यात अडचणी येऊ लागल्या. मी ज्या समाजाचे प्रतिनिधीत्व करतो, त्या राजपूत समाजाचे प्रश्न प्रलंबित राहू लागले. याविषयी वरिष्ठांकडे तक्रार करायची झाल्यास भेट मिळेनाशी झाली. त्यामुळे शेवटी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
आमदार कालिदास कोळंबकर यांच्या उपस्थितीत माझ्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा भगवा हाती घेतला. यावेळी कोळंबकर यांनी सर्वांचे आपुलकीने स्वागत केले. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार कालिदास कोळंबकर यांना बहुमताने विजयी करण्याचा संकल्प माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी केल्याचे चौहान यांनी सांगितले.