बाप इनस्पेक्टर, बेटा तस्कर! उत्तर प्रदेश मधला अजब प्रकार

    25-Nov-2024
Total Views | 94

up smuggling

लखनऊ : उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एसटीएफने रोहन नावाच्या तरुणाला मेरठमधून अटक केली आहे. रोहन हा शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे वडील यूपी पोलिसात सब इन्स्पेक्टर असून सध्या ते मथुरा येथे तैनात आहेत. आरोपी रोहनकडून १७ बंदुका आणि ७००काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पंजाबमधून ही तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी माध्यामांना दिलेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री एसटीएफला स्कॉर्पिओ वाहनातील तस्करांच्या हालचालीची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी नाकाबंदी केली. ही माहिती खरी असल्याचे आढळून आल्याने वाहनाला घेराव घालून एका तरुणाला अटक करण्यात आली. त्याच वाहनातून प्रवास करणारे अन्य चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले. स्कॉर्पिओची झडती घेतली असता त्यात १७ बंदुका व ७०० काडतुसे आढळून आली. पोलिसांनी वाहन आणि शस्त्रे जप्त केली व आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी केल्यावर लक्ष्यात आलेली गोष्ट म्हणजे त्याचे वडील राकेश सिंह मथुरा येथे सब इनस्पेकटर असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. रोहनकडून जप्त करण्यात आलेल्या बंदुकांपैकी ५ सिंगल बॅरल आणि १२ डबल बॅरल बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. यासोबतच १२ बोअरचे ७०० काडतुसेही सापडली आहेत. आपल्या वडिलांप्रमाणेच रोहन याने पोलीस दलात भरती होण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या पदरी सातत्याने अपयश आले. यानंतर अनिल बालियान या माणसाच्या सोबत तस्करी करण्यात तो गुंतला. सध्या तरी रोहन व्यतिरिक्त त्याच्या सोबत काम करणाऱ्या लोकांचा तपास सुरू आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाईक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार उघडकीस आणला. तसेच, याबाबत परिवहन विभागाकडे अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने विभागाकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. यामध्ये काही अप्रमाणित ॲप्स व बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालकांकडून शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अशा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121