मत मोजणीसाठी यंत्रणा सज्ज

मतदान यंत्र कडेकोट बंदोबस्तात स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित

    22-Nov-2024
Total Views | 48
Vote Counting

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघामध्ये बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. मतदान यंत्रे स्ट्राँग रुममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. शनिवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. उमेदवारांनीही मतमोजणीच्या ( Vote Counting ) कक्षात प्रत्येकी २२ पोलिंग एजन्ट नेमण्याची लगबग सुरू केली आहे.

ठाणे जिल्ह्यात भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मिरा-भाईंदर, ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, मुंब्रा-कळवा, ऐरोली, बेलापूर या १८ मतदारसंघात दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले.

या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार असल्याने मतमोजणीसाठी प्रशासनाने निवडणूक निरीक्षक नेमले असून कामाची लगबग सुरू झाली आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाची मोजणी वागळे इस्टेट आय.टी.आय. येथे होणार आहे. तर ठाणे शहर विधानसभेची मतमोजणी न्यू होरिझन स्कूलमध्ये तर ओवळा-माजिवड्याची मतमोजणी आनंदनगर होरिझोन स्कूलमध्ये आणि मुंब्रा-कळवा मतदारसंघाची मतमोजणी मुंब्रा येथील भारतरत्न अब्दुल कलाम स्टेडियम येथे होणार आहे.

मतमोजणी जलद होणार

विधानसभा निवडणुकीसाठी यावर्षी मतमोजणीकरिता विशेष दक्षता घेण्यात आली आहे. ईव्हीएम मशीनची मते मोजण्यासाठी जिल्ह्यात २८६ टेबलांची व्यवस्था केली आहे. पोस्टल बॅलेटची मते ८२ टेबल्स तर सैनिकांची मते मोजण्यासाठी २१ टेबल आहेत. त्यामुळे मतमोजणी जलद होणार आहे. एक तासात निकाल लागेल, असा विश्वास निवडणूक अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
अटल सेतु सह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

अटल सेतु सह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याची धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने घेतले होते. त्यानुसार २१ ऑगस्टपासून अटल सेतू सह मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121