वक्फ बोर्ड विधेयकास विरोध, वक्फ बोर्ड १ कोटी निधी, ४८ मशिदींचे सर्वेक्षण...
नोमानी यांच्या "मविआ"कडे ५ अटी आणि शर्थी
15-Nov-2024
Total Views | 100
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांची गोळाबेरीज करण्यासाठी मविआ वाटेल ते करेल याची प्रचिती पहिल्यांदाच आली नाही. वक्फ बोर्डाचे प्रवक्ते नोमानी यांनी महाविकास आघाडीला निवडून देण्यासाठी त्यांनी आपल्या काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत. मात्र आता त्याच अटी आणि शर्थी देशविघातक असल्याचे संकेत दिसून येत आहेत. वक्फ बोर्ड दुरूस्ती करण्याच्या विधेयकाला विरोध केला आहे.
नोमानी यांच्या 'या' ५ अटी आणि शर्थी
वक्फ बोर्ड दुरूस्ती करण्याच्या विधेयकाला विरोध.
वक्फ बोर्डाच्या विकासासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा.
मुस्लिम युवकांना नोकरी आणि शिक्षणामध्ये १० टक्के आरक्षण देण्याची अट ठेवण्यात आली.
२०१२-२०२४ या वर्षातील मुस्लिमांना अटक करण्यात आली आहे त्यांची सुटका करावी.
राज्यातील ४८ मशीद आणि दर्गाहचे सर्वेक्षण.
वरील या ५ शर्थीची नोमानी यांनी मागणी केली आहे. महाविकास आघाडीने मागण्यांचा आगामी निवडणुकीत निवडून आल्यास अटी मान्य करणार असल्याचे सांगितले आहे.
तर दुसरीकडे मतांची गोळाबेरीज करण्यासाठी काही दिवसांआधी मराठा आरक्षणाच्या नावावर मराठा समाजाची दिशाभूल करणारे मनोज जरांगे पाटील यांनी नोमानी यांची भेट घेतली. या भेटीतून मराठा समाजाची दिशाभूल होत असल्याचे दिसून येत आहे. मतांसाठी 'मविआ'ने जातीपातीचे राजकारण केल्याचे वेगळे सांगयाला नको.