छोट्या मदरशांना फंडींग येतं कुठून? एटीएसने रचला सापळा, कारवाई सुरू

    31-Oct-2024
Total Views | 61

madrasa ats
 
 
लखनऊ : भारतविरोधी दहशतवादी संस्थांवर कारवाई करतानाच आता या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे.
उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने सहरानपुर, शामली, मुझफ्फरनगर, या भागातील मकतब म्हणजेच छोट्या मदराशांच्या तपासणीचा कार्यक्रम सुरू केला आहे. या मदराशांना फंडींग नेमके कुठून येते याची तपासणी सध्या सुरू आहे. उत्तर प्रदेश मधल्या एकूण ४७३ छोट्या मदराशांची तपासणी सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी या मदराशांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले. याची जबाबदारी देवबंदच्या एटीएस विभागाला देण्यात आली. या एकूण तपासात शामली मधील १९०, मुझफ्फरनगर मधील १६५, आणि सहरानपुर येथील ११८ मदराशांचा समावेश आहे. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी एटीएस देवबंदचे पथक सहरानपुर शहरातील मकतबांकडे रवाना झाली. या व्यतिरीक्त शामलीच्या कैराना येथील मदराशांची सुद्धा चौकशी करण्यात आली. पानिपत रोडवर असलेल्या मदरसा फलाहुल मुबीन आणि मदरसा फैज मसीहुल उम्मतला या मदराशांची चौकशी करण्यात आली आहे.

तपासणीत आढळला आर्थिक गैरव्यव्हार
या तपासणीत मोठ्या प्रमाणात मदराशांमध्ये आर्थिक गैरव्यव्हार झाल्याचे दिसून आले आहे. या संदर्भातील रिपोर्ट एटीसने सरकारला पाठवला आहे. या आधी सुद्धा उत्तर प्रदेश सरकारने राज्यभरातील मदरशांचे व्यापक सर्वेक्षण केले होते, त्याअंतर्गत अनेक बेकायदेशीर मदरसे बंद करण्यात आले होते. या व्यतिरीक्त उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात देखील २० बेकायदेशीर मदरासे सुरू होते. त्यांना बंद करण्या संबंधीत पत्रव्यव्हार तिथल्या अल्पसंख्यांक अधिकारी यांनी केला.

मकतब म्हणजे काय ?
मकतब म्हणजे एक अरबी शब्द असून त्याचा अर्थ अभ्यासाचे ठिकाण असा होतो. मकतब आणि मदरासा यांच्या मधील फरक म्हणजे मदरासा मध्ये शिक्षण घेतल्या नंतर, एक औपचारिक पदवी विद्यार्थांना दिली जाते. परंतु मकतब मध्ये अश्या कुठल्याही पद्धीतीची सुविधा अस्तितवात नाही. मकतब हा मदरास्यांचाच एक भाग असून इथे इस्लामची शिकवण येथील विद्यार्थींना देण्यात येते. मकतब चालवणारे मौलवी कुठल्याही पद्धतीचे शुल्क आकारत नाही. यासाठी समाजातूनच निधी गोळा केला जातो. या निधीचा वापर नेमका कसा केला जातो ? पैसे नेमके कुठे जाते ? या संदर्भात अस्पष्टता असल्यामुळे, एनआयने कारवाईचा दंडुका उगारला आहे.


 
अग्रलेख
जरुर वाचा
बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी देणार नाही;

"बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी देणार नाही"; 'या' मुस्लिम बहुल राष्ट्राने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण...

(Muslim Country Morocco Bans Animal Sacrifice on Bakrid) आफ्रिकेतील इस्लामिक देश असलेल्या मोरोक्कोमध्ये बकरी ईदच्या दिवशी प्राण्यांच्या कुर्बानी देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुस्लिम बहुल राष्ट्र असलेल्या मोरोक्कोचा राजा मोहम्मद सहावा यांनी हा निर्णय घेतला आहे. इस्लाममध्ये बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याला खूप महत्त्व देण्यात आले आहे. मोरोक्कोच्या लोकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे आता या निर्णयाची जगभरात चर्चा होत आहे. मोरोक्कोतील पशु बाजार बंद करण्यात आले असून राजाने बकरीसह कोणत्याही प्राण्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121