सर्वाना सुख-समृध्दी लाभो, तसेच महाराष्ट्राच्या सेवेसाठी बळ मिळो’ अशी प्रार्थना करीत मत्स्येंद्रनाथांच्या चरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण नतमस्तक झाले. निमित्त होते ते गुरूपौणिमेनिमित्त मलंगगडावर केलेल्या आरतीचे.
Read More
अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवरील सुपरहिट वेब सिरीज 'पंचायत' च्या पाचव्या सिझनची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 'फुलेरा' या काल्पनिक उत्तर भारतीय गावातील सरपंच, सचिव, आणि ग्रामस्थांच्या साध्यासुध्या पण प्रभावी जीवनावर आधारित ही मालिका आजवर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेली आहे. आता सिझन ५ बाबत काही महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत.
उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची सध्या जोरदार चर्चा असताना आता संजय राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. इंटरेस्टिंग वाक्य आहे, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे भास्कर जाधवांच्या स्टेटसची खिल्ली उडवल्याचे बोलले जात आहे.
मुंबई महापालिकेने गेल्या सहा महिन्यात २ लाख ५० हजार उंदरांचा खात्मा केल्याची बाब संशयास्पद आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यातील उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी बुधवार, २५ जून रोजी दिले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बीएमसीकडून नंबर जारी ८९९९२२८९९९ या क्रमांकावर सुविधेचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्यावतीने मुंबईकरांसाठी योग केंद्राबाबत माहिती पुरवणारी व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी मुंबईकरांनी ८९९९२२८९९९ या क्रमांकावर संदेश पाठवून संपर्क साधल्यास नजीकच्या परिसरातील शिव योग केंद्रांबाबत अद्ययावत व सविस्तर माहिती मिळेल.
जगातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडीया प्लटफॉम पैकी व्हाट्सअॅप हे आता आपल्या वापरकर्त्यांसाठी जाहिराती पर्याय सुरू करत आहे. व्हाट्सअॅपची मूळ कंपनी असणारी 'मेटा'ने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. यादरम्यान व्हाटअॅपचे सह- संस्थापक जॅन कौम यांनी दिलेलं वचन हे खोटं ठरलं आहे.
इस्रायल-इराण युद्धसंघर्षाच्या पाश्वभूमीवर इराणने नागरिकांना त्यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप अनइनस्टॉल करण्याचे आवाहन केले आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहीनीवर प्रसारित झालेल्या या आवाहनात असे दाखवण्यात आले आहे की, व्हॉट्सअॅप हे इस्रायलसोबत डेटा शेअर करण्यासाठी वापरकर्त्यांचा डेटा गोळा करत आहे. परंतू व्हॉट्सअॅपने हे आरोप नाकारले आहेत.
अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील सर्वाधिक लोकप्रिय वेबसिरीजपैकी एक असलेली ‘पंचायत’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाली आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेच्या चौथ्या सिझनचा ट्रेलर आज ११ जून रोजी प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दै. ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित आणि ‘एसएफसी एनव्हायर्नमेंटल टेक्नोलॉजीज’ प्रस्तुत ‘स्पिसीज अॅण्ड हॅबीटॅट्स वॉरियर्स अॅवॉर्ड-2025’ हा पुरस्कार सोहळा गुरुवार, दि. 5 जून रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे मान्यवर आणि निसर्गप्रेमींच्या उपस्थितीत अत्यंत दिमाखात पार पडला. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘योगायतन पोर्ट ग्रुप’ हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मत्स्य व्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे यांनी यावेळेस वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनासाठी का
भिवंडी तालुक्यातील पडघा येथील बोरिवली गावात महाराट्र एटीएसने छापेमारी केली असून अनेक घरांची तपासणी करण्यात येत आहे. दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या संशयावरून अनेक घरांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
(ATS arrests Ravindra Verma) महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली रविंद्र वर्मा (Ravindra Verma) याला अटक करण्यात आली आहे.
( ATS arrests youth in Malegaon on suspicion searching Pakistani websites ) भारत-पाकिस्तानमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती असताना मालेगाव शहरातील एका तरुणाने संशयास्पदरित्या पाकिस्तानची वेबसाईट सर्च केल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाला बुधवार, दि. 14 मे रोजी एटीएसने ताब्यात घेत त्याची सहा तास कसून चौकशी केली. काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्याटकांचा बळी दहशतवाद्यांनी घेतल्यानंतर भारताने त्याविरोधात कठोर पावले उचलत प्रत्युत्तर दिले. भारताच्या सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त
( Whats strategy behind Americas trade war ) आयातकर वाढीवरुन अमेरिकेने छेडलेले हे व्यापारयुद्ध आणखीन भडकण्याची शक्यता असून, त्याचे पडसादही जागतिक स्तरावर उमटू लागले आहेत. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, ही करवाढ अमेरिकेसाठी सर्वांगीण फायद्याची असेल, तर अमेरिकन बाजारपेठेने या निर्णयाचे मुक्तकंठाने स्वागत का केले नाही? त्यामुळे अमेरिकेच्या व्यापारयुद्धामागची नेमकी रणनीती तरी काय? त्याचे आणखीन काय भीषण परिणाम होतील? यांसारख्या प्रश्नांचा ऊहापोह करणारा हा लेख...
व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम अकाउंटला रिपोर्ट करत आयकर विभागाने २५० करोड रुपयांची संपत्ती ताब्यात घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २५ मार्च २०२५ रोजी संसदेत दिली आहे. अवैध पद्धतीने अर्थिक देवाणघेवाणीवर चाप बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला.याविरोधात अद्यापही कोणताही कायदा नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
( Meta Services to be provided to the public through WhatsApp for bribery ) “राज्यातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लाच दिल्याशिवाय कामे होत नाहीत. त्यामुळे लाचखोरीला आळा घालण्यासाठी या कार्यालयातील सर्व सेवा डिजिटल आणि ऑनलाईन केल्या जाणार आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सर्व प्रक्रिया तीन महिन्यांत ऑनलाईन केल्या जातील. सुनावणी किंवा इतर कामे यासाठी कुणीही कार्यालयात जाणार नाही. आम्ही ‘मेटा’समवेत करार केला असून या कार्यालयातील सर्व सेवा व्हॉट्सपद्वारे जनतेला पुरवल्या जातील,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र
Ulfat Hussain arrested उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने मोठी कारवाई करत हिजबुल मजाहिदीनचा फरार असलेला आंतकवादी उल्फत हुसेनला मुरादाबादमधून अटक केली आहे. या आतंकवाद्याचा शोध घेण्यासाठी २५ हजार रुपयांचे बक्षीस लावण्यात आले होते. त्यानंतर आता एटीएसने कटघर पोलिसांसह संयुक्त कारवाई करत या दहशतवाद्याला अटक केली. तो गेली १८ वर्षांपासून फरार होता, आता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
आपले सरकार पोर्टलवरील ५०० सेवा आता व्हॉट्सअँपवर उपलब्ध होणार आहे. त्याबाबत मेटा शी करार करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी केली. या माध्यमातून महाराष्ट्रात ‘व्हॉट्सअँप गव्हर्नन्स’चा नवा अध्याय सुरू होत असल्याचे ते म्हणाले
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे व्हॉट्सॲप हॅक झाल्याचे वृत्त झळकले. “माझ्या व्हॉट्सॲप क्रमांकावरुन कुणालाही काही संदेश येईल, तर प्रतिसाद देऊ नये,” असे आवाहन कोकाटेंना करावे लागले. व्हॉट्सॲपवरच्या ठगांनी नेमका कसला धुडगूस घातला आहे? अशा ऑनलाईन दरोडेखोरांपासून वाचण्यासाठी उपाययोजना काय? त्याचे हे आकलन...
Bangladeshi केरळ राज्यातील कोची या शहरामध्ये काही वर्षांपासून बांगलादेशी (Bangladeshi) घुसखोरी करत वास्तव्य करत आहेत. याचपार्श्वभूमीवर आता केरळ पोलीस आणि दहशतवादी विरोधी पथकाने संबंधित बांगलादेशी घुसखोरी करणाऱ्या २७ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना शुक्रवारी ३१ जानेवारी २०२५ रोजी घडली असल्याचे बोलले जात आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याचे प्रकरण अद्याप पूर्णपणे शांत झालेलं नसताना बॉलिवूडमध्ये एका नव्या प्रकरणानं तोंड वर काढलयं. बॉलिवूडमधल्या लोकप्रिय अभिनेत्यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचे समोर आले आहे. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेता राजपाल यादव, कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांना ईमेलच्या माध्यमातून धमकी मिळाली आहे.
Bangladeshi तमिळनाडू राज्यातील कोईम्बतूरच्या दहशतवादी विरोधी पथकाने बांगलादेशी (Bangladeshi) घुसखोरांची तपासणी करत असताना ३१ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. एटीएसने तिरूपूर आणि कोईम्बूतर जिल्ह्यातून त्यांना पकडण्यात आले. शिवाय त्रिपुरामध्ये बांगलादेशींकडून होणाऱ्या शस्त्रांची तस्करी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तसेच तीन बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे.
Shri Swami Samarth अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांचा मासिक महासत्संग २५ जानेवारी ऐवजी १८ जानेवारी २०२५ रोजी श्री गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.
(Delhi Bomb Threats) दिल्लीतील विविध शाळांना बॉम्बच्या धमक्या असलेले ईमेल पाठवल्याचे प्रकरण सोडवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी विद्यार्थी बारावीच्या एका विद्यार्थ्याला अटक केली आहे.
ATS महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात देशव्यापी कारवाई म्हणून ९ बांगलदेशींना अटक करण्यात आली आहे. दहशतवादी विरोधी पथकाने ३१ डिसेंबर २०२४ रोजी या कारवाईची माहिती दिली आहे. मुंबई, नाशिक, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणांहून हे घुसखोरी करणारे लोक सापडले असल्याची माहिती समोर आली आहे.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर ( Nana Patekar ) यांचा वनवास हा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी साकारलेल्या नटसम्राट, तिरंगा अशा अनेक चित्रपटांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे.
ठाणे : बृहन्मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणार्या पाणीपुरवठ्यात कपात झाली आहे. या दुरूस्तीच्या कामामुळे बंधार्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्याने ठाणे महापालिकेस होणार्या पाणी पुरवठ्यातही घट झाली आहे. एकूण ३० टक्के पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे पालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात २४ तासांसाठी पाणीपुरवठा ( Water supply ) बंद ठेवून पाणी वितरणाचे नियोजन करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी), भारतीय नौदल आणि गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाईत भारतीय सागरी हद्दीत सुमारे ७०० किलो मेथ अंमली पदार्थाची खेप पकडली आहे. ‘ऑपरेशन सागरमंथन’ ( Operation Sagarmanthan ) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई : हिंदू सण-समारंभ आणि धार्मिक कार्यांना विरोध करणार्या काँग्रेसने आता सत्संगालाही विरोध करण्याचा विडा उचलला आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर’तर्फे धारावी येथे आयोजित श्री श्री रवीशंकर यांची गुरुपूजा काँग्रेस ( Congress ) खा. वर्षा गायकवाड यांच्या मुजोर पतीने बंद पाडली. तसेच दादागिरी करीत प्रचंड गोंधळ घातला.
Hindu Satsang सण - समारंभ आणि धार्मिक कार्यांना विरोध करणाऱ्या काँग्रेसने आता सत्संगालाही विरोध करण्याचा विडा उचलला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरतर्फे धारावी येथे आयोजित श्री. श्री. रवीशंकर यांची गुरुपूजा काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या मुजोर पतीने बंद पाडली. तसेच दादागिरी करीत प्रचंड गोंधळ घातला.
'अध्यात्मिक परिवर्तनसोबतच सामजिक परिवर्तन गरजेचं... ', मैत्रेय दादाश्रीजी यांच्या मार्गदर्शनपर पत्राचे वाचन
भारतविरोधी दहशतवादी संस्थांवर कारवाई करतानाच आता या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने सहरानपुर, शामली, मुझफ्फरनगर, या भागातील मकतब म्हणजेच छोट्या मदराशांच्या तपासणीचा कार्यक्रम सुरू केला आहे. या मदराशांना फंडींग नेमके कुठून येते याची तपासणी सध्या सुरू आहे. उत्तर प्रदेश मधल्या एकूण ४७३ छोट्या मदराशांची तपासणी सुरू आहे.
( Ministry of Civil Aviation ) विमानात बॉम्ब असल्याच्या खोट्या अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच कायदा करणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी सोमवार दि. २१ ऑक्टोबर रोजी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या धमक्या लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या गॅंगकडून देण्यात येत आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून थेट मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हा मेसेज केला आहे. आणि त्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव देखील घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या मेसेजमध्ये नुकतीच हत्या करण्यात आलेल्या बाबा सिद्दिकी यांचाही उल्लेख केला असून त्यांच्यापेक्षा सलमान खानची वाईट अवस्था होईल, असं म्हटलं आहे. या पार्
महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमएमओसीएल) प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत व्हॉट्सअॅपवर आधारित तिकीट सेवा सुरू केली आहे. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत या उपक्रमाचे उद्घाटन महिला प्रवाशांच्या हस्ते अभिमानाने करण्यात आले. मेट्रो लाईन २ए आणि ७च्या प्रवाशांसाठी ही नवीन सुविधा उपलब्ध आहे. यामुळे प्रवासी थेट व्हॉट्सअॅपवरून तिकीट खरेदी करू शकतात. यासाठी स्वतंत्र मोबाइल अॅपची गरज नाही. त्यामुळे अधिक सोपी युझर-फ्रेंडली म्हणजे वापरकर्त्यासाठी सोयीची असलेली सेवा उपलब्ध होणार आहे.
काय स्वप्न होते? हरियाणामध्ये जिंकलो की तो दिवस ‘जिलेबी दिवस’ म्हणून साजरा करणार! हरियाणामध्ये जिलेबीने धोका दिला. ‘बिग बॉस’मध्ये सुरज म्हणतो ना, ‘गुलीगत धोका’. अगदी तसाच धोका हरियाणावाल्यांनी दिला. आता महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ‘लाडकी बहीण योजने’बद्दल काहीतरी खोटे पसरवले पाहिजे. काम न करता सहानुभूती मिळवायला पाहिजे.
Ats उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एटीएस (Ats) आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला आहे. या छाप्यातच एका कट्टरपंथी तरूणाला पकडण्यात आले आहे. या तरूणाचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. एटीएस आणि दिल्ली पोलिसांचा तपास सुरू आहे. तसेच यासोबत महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे छापे टाकण्यात आला होता.
Tirupati Balaji तिरुपती मंदिरात जगन सरकारच्या काळात प्रसाद बनवण्यासाठी प्राण्यांची चरबी असलेले तूप वापरले जात असल्याचा दावा चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. तो दावा एक अहवालातून खरा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जगन सरकारच्या अडचणी वाढल्याचे दिसू लागले आहे. नेमके प्रकरण काय, पाहा संपूर्ण व्हिडिओ...
(Konkan) विषारी सापांचे माहेरघर कोकणचे किनारी सडे Species & Habitats Awareness Programme. The First Ever Wildlife Video Series In Marathi.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण एनपीएस-वात्सल्य योजनेचा शुभारंभ करणार आहेत. दि. १८ सप्टेंबर रोजी अर्थमंत्री सीतारामण यांनी एनपीएस-वात्सल्य योजनेच्या माध्यमातून देशभरातील पालक आणि त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी खाती उघडता येणार आहेत. तसेच, सेवानिवृत्तीच्या वेळेस बचतीत योगदान देता येणार आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गणेश विसर्जनादरम्यान मुंबईतील समुद्रात मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. गणेश विसर्जनादरम्यान गणेश भक्तांना मत्स्यदंश करू शकणारे अपायकारक मासे हे मत्स्य विभागाने केलेल्या 'ट्रायल नेटिंग' मध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (महाराष्ट्र शासन) यांच्याकडून कळविण्यात आले आहेत.
राष्ट्रावादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सॲप हॅक झाले आहे. त्यांनी रविवारी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली होती. तसेच सर्वांनी आपल्या डिजिटल सुरक्षेविषयी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहनही केले होते. दरम्यान, आता याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज रंगशारदा येथील मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वक्तव्य केले. ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्याचा भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलेली ही व्यक्तिगत धमकी आहे. परंतु भाजपा अशा धमक्यांना भीक घालत नाही. बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडल्याचे उद्धव ठाकरेंच्या अशा बेताल वक्तव्यातून दिसून येते. उद्धव ठाकरे यांनी सर्व राजकीय परंपरा, संस्कृती गुंडाळून ठेवलीय, असे जोरदार प्रत्युत्तर दरेकर यांनी दिले. ते पत्र
हज हा मुस्लिम धर्मीयांच्या पाच मोठ्या धार्मिक कार्यांपैकी एक आहे. आयुष्यात एकदा तरी सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना दरम्यान धार्मिक तीर्थयात्रा करणे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे. मात्र यंदा सौदी अरेबियात हज यात्रा पूर्ण करण्याच्या नादात लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कडक उन्हामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत २२ हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तर उष्माघातामुळे २७०० हून अधिक लोकांची अवस्था गंभीर आहे.
शहरातील वाढत्या रोहिंग्या आणि बांग्लादेशी लोकांच्या अनधिकृत वास्तव्यामुळे फक्त पोलिसांची नाही, तर आपल्या समाजाची देखील डोकेदुखी वाढली आहे, असे कॅबिनेट मंत्री तथा उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये स्थलांतराच्या पोस्टर्समुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. मात्र, यावेळी 'सर्व हिंदू समाज'च्या नावाने पोस्टर लावण्यात आले असून हिंदूंना घर न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुधवार, दि. १२ जून २०२४ भिंतींवर असे पोस्टर्स दिसले कारण अनेक अहवालांनुसार, जयपूरच्या शास्त्री नगर भागातील हिंदू या परिसरात राहणाऱ्या कट्टरपंथीयांच्या त्रासाला कंटाळून आपली घरे सोडण्याचा विचार करत आहेत.
गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) इस्लामिक स्टेट (ISIS) च्या ४ दहशतवाद्यांना अहमदाबाद, गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली आहे. हे सर्वजण श्रीलंकेतून भारतात आले. त्यांना दि. २० मे २०२४ रोजी पकडण्यात आले.
अदानी एनर्जी सोल्युशन लिमिटेड (AESL) कंपनीने Essar Transco Ltd कंपनीचे १९०० कोटींना अधिग्रहण केले आहे. मंगळवारी याविषयी अदानी समुहाने माहिती दिली असुन सर्व प्रकिया पार पाडत हे अधिग्रहण केले आहे. जून २०२२ मध्ये दोन्ही कंपन्यांमध्ये हा करार झाला होता. त्याचा अंतिम टप्पा म्हणून कंपनीने हे अधिग्रहण केले आहे.
युट्यूबर ध्रुव राठी याने नुकताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक व्हिडिओ तयार केला. महाराज कसे मुस्लीमधार्जिणे होते, हे सिद्ध करण्यासाठी अनेक खोट्या गोष्टी सांगण्यापासून इतिहासात नवीन पात्र जन्माला घालण्यापर्यंतच्या कसरती ध्रुव राठीने त्या व्हिडिओत केल्या आहेत. त्याचा तो व्हिडिओ बघून मला नवीन काही वाटले नाही. कदाचित, ध्रुवला त्या व्हिडिओची ‘स्क्रिप्ट’ एखाद्या ‘ब्रिगेडी’ अथवा ‘बामसेफी’ माणसाने लिहून दिली असावी. कारण, हाच खोटा इतिहास हे लोक महाराष्ट्राच्या कानीकपाळी ओरडून सांगत असतात.
संत नामदेव हे पहिले राष्ट्रीय संतकवी आहेत. ते मराठीएवढेच हिंदी भक्ती साहित्यामध्येही ख्यातकीर्त. गुरू नानक, कबीर, रवीदास हे त्यांना गुरुस्थानी मानतात, ही त्यांची थोरवी. हिंदी भाषेतील भक्ती साहित्याचे व रामोपासनेचे संत नामदेव हे प्रवर्तक मानले जातात. नामदेवांचे राष्ट्रीय योगदान समस्त मराठीजनांना अभिमानास्पद आहे. मराठीतील सगुणोपासक नामदेव, हिंदीमध्ये निर्गुणोपासक रामभक्त आहेत.संत नामदेवांच्या अभंगगाथेतील ‘रामकथा माहात्म्य’चा काही भाग आपण मागील लेखात पाहिला. उर्वरित भाग पाहून नामदेवांच्या हिंदी पदातील रामदर्शन
लोकसभा निवडणुकीदरम्यान, महाराजगंज जिल्ह्याला लागून असलेल्या भारत-नेपाळ सीमेवर सुरक्षा यंत्रणांनी तीन संशयितांना अटक करून त्यांना एटीएसच्या ताब्यात दिले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन पाकिस्तानी आणि एक जम्मू-काश्मीरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून पाकिस्तानी पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे.