मुंबई : सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत एकीकडे सलमान खान विरुदध लॉरेन्स बिश्नोई प्रकरण आणि दुसरीकडे ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या बातम्या अधिक चर्चेत आहेत. गेल्या काळात कोणत्याच समारंभात अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र दिसले नाही आणि त्यामुळेच त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या पसरु लागल्या. दरम्यान, अभिषेक-ऐश्वर्या बद्दल आणखी माहिती जाणून घेऊयात...
अभिषेक बच्चनबद्दल सांगायचे झाल्यास त्याने मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. यानंतर त्याने पदवीसाठी अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र शिक्षण अर्धवट सोडून तो मुंबईत परतला. पदवी न घेताच त्याने चित्रपटांमध्ये कामं करण्यास सुरुवात केली.
ऐश्वर्या रायनेही तिचे शिक्षण मुंबईतून केले आहे. तिचे प्राथमिक शिक्षण आर्य विद्या मंदिर हायस्कूलमधून, जय हिंद महाविद्यालयातून इंटरमिजिएट केले. पुढे तिने आर्किटेक्चरमध्ये करिअर करण्यासाठी ॲकॅडमी ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रवेश घेतला, परंतु मॉडेलिंगमध्ये अधिक रुची वाढल्यामुळे तिने शिक्षण सोडून मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला.
दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी एकत्र देखील काम केले आहे. नुकताच अभिषेकचा लेट्स टॉक अबाउट या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. तर ऐश्वर्या सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसून ती विविध कार्यक्रमांना मात्र आवर्जून हजेरी लावत आहे.