घट्ट मिठी अन् प्रेमाचा वर्षाव! सूरज चव्हाणला केदार शिंदेंनी दिली खास भेटवस्तू

    21-Oct-2024
Total Views | 56
 
kedar shinde
 
 
मुंबई : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा सूरज चव्हाण विजेता ठरला. सूरज चव्हाण विजेता झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला. प्रेक्षकांना सूरजचा साधेपणा, खरा स्वभाव आणि टास्कमध्ये दिलेलं १०० टक्के योगदान नक्कीच भावलं. सूरजला बिग बॉसमध्ये सहभागी करुन घेण्यास कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदेंचंही योगदान आहे. बिग बॉसनंतरही केदार शिंदे आणि सूरज चव्हाणचं खास नातं बघायला मिळत आहे. नुकतीच केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणची खास भेट घेतली असून त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सूरजच्या खांद्यावर हात ठेऊन केदार शिंदे येताना दिसत आहेत. पुढे केदार शिंदे सूरजला त्यांच्या घरी घेऊन जाताना दिसले.सूरज अत्यंत आदराने आणि प्रेमाने केदार शिंदेंना मिठी मारतो. पुढे केदार शिंदे सूरजला एक खास गिफ्ट देतात. या गिफ्टमध्ये एक बॉक्स असतो. केदार शिंदे तो बॉक्स उघडून सूरजसमोर ठेवतात. पुढे केदार शिंदे सूरज चव्हाणला त्या गिफ्टचा अर्थ समजावताना दिसतात. केदार शिंदेंचं सूरजला खास गिफ्ट केदार शिंदेंनी सूरजला खास गिफ्ट दिलं. या
 
केदार यांनी दिलेल्या त्याबॉक्समध्ये विठ्ठलाची मूर्ती होती. याशिवाय सोनेरी रंगाच्या पादुका पाहायला मिळाल्या. सूरज या भेटवस्तूचा प्रेमाने स्वीकार करतो. केदार आणि सूरज यांच्या या भेटीचा व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल झालाय. अनेकांनी "केदार शिंदे सर असंच लक्ष राहु द्या पोरावर", "आयुष्यात फक्त चांगली संगत महत्वाची असते ती तुला आत्ता लाभली भावा असाच पुढे जात रहा", अशा कमेंट करुन सर्वांनी सूरज आणि केदार शिंदेंचं कौतुक केलंय. केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीच्या फिनालेला सूरजवर 'झापुकझुपुक' सिनेमा काढणार असल्याचं सांगितलं.
 
केदार शिंदेंचं सूरजला खास गिफ्ट केदार शिंदेंनी सूरजला खास गिफ्ट दिलं. या गिफ्टमध्ये एका बॉक्समध्ये विठ्ठलाची मूर्ती असलेली दिसली. याशिवाय सोनेरी रंगाच्या पादुका पाहायला मिळाल्या. सूरज या भेटवस्तूचा प्रेमाने स्वीकार करतो. केदार आणि सूरज यांच्या या भेटीचा व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल झालाय. अनेकांनी "केदार शिंदे सर असंच लक्ष राहु द्या पोरावर", "आयुष्यात फक्त चांगली संगत महत्वाची असते ती तुला आत्ता लाभली भावा असाच पुढे जात रहा", अशा कमेंट करुन सर्वांनी सूरज आणि केदार शिंदेंचं कौतुक केलं आहे. केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्याला सूरजवर 'झापुकझुपुक' चित्रपट काढणार असल्याचं सांगितलं.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121