‘स्त्री २’च्या यशानंतर ‘स्त्री ३’ लवकरच येणार? श्रद्धा कपूरने दिली ‘ही’ अपडेट
19-Oct-2024
Total Views | 53
मुंबई : अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री २ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. शिवाय प्रेक्षकांनीही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. १५ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५० कोटींहून अधिक कमाई केली होती. ‘स्त्री २’ चित्रपटाने अनेक रेकॉर्डही मोडले. एकूण ६०० कोटींहून अधिक गल्ला जमवणाऱ्या श्रद्धा आणि राजकुमारची जोडी पुन्हा भेटीला येण्याची शक्यता आहे. आता ‘स्त्री ३’ चित्रपटाबाबत श्रद्धा कपूरने एक मोठी अपडेट दिली आहे.
नुकताच ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘स्क्रीन मॅगझिन’चा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी तिने सध्या मिळत असलेल्या यशाबद्दल आणि ‘स्त्री ३’ चित्रपटाबद्दल सांगितलं. श्रद्धा म्हणाली की, ‘मी अजूनही आई-वडील, भाऊ आणि माझ्या कुत्र्याबरोबर राहते. मला वाटतं, मी खूप भाग्यवान आहे. पण, यशासाठी अपयश खूप गरजेचं आहे, असं मला खूप वाटतं.
पुढे ती म्हणाली की, “माझे दिग्दर्शक अमर सर म्हणाले, ‘स्त्री ३’ चित्रपटासाठी कथा मिळाली आहे. त्यामुळे मी स्वतः खूप उत्सुक आहे. काहीतरी भन्नाट होणार, असं मला वाटतंय. त्यामुळे मीदेखील ‘स्त्री ३’ चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खूप उत्साहित आहे.”