मोठी बातमी! आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाची तारीख आली समोर, पाहा कुठे आणि केव्हा होणार?

    17-Oct-2024
Total Views | 109

 Ipl 2025 Auction

मुंबई : आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव  (Ipl Auction 2025) २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची आनंदवार्ता क्रिकेट रसिकांसाठी आहे. यंदाच्या आयपीएल २०२५ चा लिलाव हा सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये केला जाऊ शकतो, मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र मेगा लिलावाआधी आयपीएलमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांना राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी शेअर करण्यात आली आहे.
 
आयपीएलचा शेवटचा लिलाव दुबईत पार पडला. पण यावेळी रियाध येथे आयपीएलची होण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावासाठी इतर काही शहरांची नावे चर्चेत असल्याची माहिती असून यासाठी लंडन आणि सिंगापूरचा विचार करण्यात आला होता़.
 
स्टार स्पोर्ट्स या क्रिडा वृत्तानुसार, लिलावासाठी रियाधची निवड करण्यात आली आहे.  यासोबतच प्रक्षेपणाच्या बाबतीतही सुलभता येईल. याप्रकरणी कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
 
कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात
रियाध येथे लिलावाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती आहे. सर्व संघांशी ( फ्रँचायझी) संबंधित अधिकारी लिलावासाठी रियाध येथे दाखल होतील असे सांगण्यात आले आहे. यावेळी इतर काही क्रिडा वाहिनीचे पथक रियाध येथे जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
दरम्यान, सर्व संघांना ३१ ऑक्टोबरपूर्वी खेळाडूंची यादी जाहीर होईल अशी माहिती आहे. ही यादी बीसीसीआयकडे सादर करावी लागणार आहे. यावेळी अनेक मोठे खेळाडू संघ बदलतील अशी चर्चा आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121